अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोनची निर्यात वाढली
देशातील अॅपलचे उत्पादन आणि पीएलआय योजना ठरल्या सकारात्मक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत स्मार्टफोन निर्यातीत एक मोठे केंद्र बनत आहे. एका अहवालातील माहितीनुसार भारत, 2025 च्या पहिल्या सहामाहीत अमेरिकेला जवळपास 36 टक्के स्मार्टफोन निर्यात केले आहेत. जे प्रमाण मागच्या वर्षी 11 टक्के होते. ही तेजी प्राप्त होण्याचे मोठे कारण म्हणजे अॅपलने भारतामध्ये वाढविलेले उत्पादन आणि सरकारची धोरणे, विदेशी कंपन्यांना भारतामध्ये स्थान बळकट करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन हे ही कारणीभूत ठरले आहे.
या व्यतिरिक्त, चीनसोबत वाढता तणाव यामुळे कंपनी भारताच्या बाजूने राहिली आहे. जानेवारी ते मे 2025 भारताने 2.13 दशलक्ष स्मार्टफोन्स अमेरिकेला पाठवले आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन पट अधिक आहेत. स्मार्टफोन्सची निर्यात 9.35 अब्ज डॉलरची आहे. या दरम्यान भारतातून स्मार्टफोनची निर्यात 182 टक्के वाढली आहे.
चायनामधील स्टोर बंद करणार
अॅपलने चीनमधील आपले रिटेल स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्टोअर डालियान शहरातील झोंगशानमध्ये स्थित पार्कलँड मॉलमध्ये आहे. 9 ऑगस्ट रोजी हे स्टोअर कायमचे बंद होणार आहे. चीन अॅपलसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. येथे जवळपास 56 स्टोअर्स आहेत, जो जगभरातील कुल स्टोअर्सचा 10 टक्के हिस्सा आहे. तसा हा निर्णय मोठाच मानला जात आहे.