स्मार्ट सिटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची मागणी
पणजी : कोट्यावधी ऊपयांच्या पणजी स्मार्ट सिटी घोटाळ्यात भ्रष्टाचारविरोधी विभागाने माजी व्यवस्थापकीय संचालक स्वयंदीप्त पाल चौधरी याच्या विरोधात या प्रकरणातील पहिला एफआयआर नोंद केल्याने या प्रकरणाची सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधिशाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. या घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसने वेळोवेळी सांगितले आहे आणि सिद्ध केले आहे की संपूर्ण स्मार्ट सिटी प्रकल्प हा एक मोठा घोटाळा आहे. या एफआयआरमध्ये केवळ 87 लाख ऊपयांची आर्थिक अनियमितता असल्याचे म्हटले आहे, परंतु आम्हाला माहीत आहे की ही रक्कम कितीतरी अधिक आहे आणि या कोट्यावधींच्या घोटाळ्यात इतर अनेकजण सामील आहेत.
घोटाळ्याची चौकशी करणारा भ्रष्टाचार विरोधी विभाग सत्ताधारी भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे निष्पक्ष चौकशी करू शकत नाही आणि यासाठी याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. आम्ही जेव्हा जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्मार्ट सिटीच्या कामात घोटाळा झाल्याचे मान्य करण्यास नकार दिला. आता एफआयआर नोंद झाल्याने त्यांच्याकडे या संदर्भात काय उत्तर आहे? ते काय कारवाई करणार? असा प्रŽ आलेमाव यांनी केला. या एफआयआरच्या मार्फत असे सिद्ध झाले आहे की सावंत यांचे नोकरशाहीवर कोणतेही नियंत्रण नाही. प्रथम, जमीन घोटाळ्यात मुख्य सचिव यांचा पर्दाफाश झाला. आता स्मार्ट सिटी प्रकल्पाचा माजी व्यवस्थापकीय संचालक स्वयंदीप्त पाल चौधरी याच्या विरोधात एफआयआर नोंद झाला आहे, असा आरोप आलेमाव यांनी केला.