जगातील सर्वात छोटे विमानतळ
झाडाखाली वेटिंग एरिया, स्कॅनिंग मशीन नाही
एकेकाळी लोकांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत प्रवास करणे अत्यंत कठिण होते. विशेषकरून जर कुणी विमानातून प्रवास करत असेल तर त्याच्यासाठी ही मोठी बाब होती. परंतु कालौघात लोकांसाठी हे आता सर्वकाही सामान्य ठरत चालले आहे. अद्याप एक असे विमानतळ आहे, जे लक्झरी प्रवासाची ऑफर देते, परंतु विमानतळावर असे काहीच दिसून येत नाही.
विमानतळाचा उल्लेख होताच लक्झरी फीलिंग येते. येथे चेक इन करण्यात आल्यावर अत्यंत हायक्लास सुविधा मिळतात, यामुळे माणसाची प्रतीक्षा देखील एका हॅप्पी ट्रिपमध्ये बदलून जाते. परंतु जगात एक असे विमानतळ आहे, सर्वसामान्य विमानतळांपेक्षा अत्यंत वेगळे आहे. येथे लक्झरीसारखे काहीच नाही.
कोलंबियाच्या अगुआचिका नावाच्या ठिकाणी हॅकारिटॅमा विमानतळ आहे. हे जगभरात स्वत:च्या कमी जागेत निर्माण झाल्यामुळे प्रसिद्ध आहे. या विमानतळावर केवळ दोन वेटिंग एरिया आहेत. यातील एकाठिकाणी लगेज चेक होते. तेथे सामान चेक करण्यासाठी कुठलाच स्कॅनर नाही, तर मॅन्युअली तपासणी केली जाते. प्रत्यक्षात या विमानतळावर स्कॅनर मशीनसाठी जागाच नाही. जेव्हा लोक विमानतळावर येतात, तेव्हा उन्हात उभे राहून त्यांना प्रतीक्षा करावी लागते.
झाडाखाली वेटिंग एरिया
येथे प्रतीक्षा करणाऱ्या लोकांसाठी कुठलीच आलिशान वेटिंग रुम नाही. तर लोक आंब्याच्या झाडाखाली निर्माण करण्यात आलेल्या बेंचवर बसून प्रतीक्षा करतात. पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी एक वेटिंग रुम आहे. येथे केवळ 48 प्रवासीच असतात, याचमुळे हे अत्यंत स्वच्छत असते. येथे छोटी विमाने उतरत असली तरीही सीट्स अत्यंत आरामदायी असतात. येथे सामान डेस्टिनेशनवर नेण्यासाठी एक तिकिट दिले जाते, जे नंतर दाखवावे लागते.