हळूहळू मृत्यूला जातोय सामोरा
एखादा व्यक्ती 46 वर्षांपासून छोट्याशा खोलीत कसा जगू शकतो याचा विचार कधी केला आहे का? ब्रिटनचा नागरिक 72 वर्षीय रॉबर्ट मॉड्सलीसोबत हे घडत आहे. रॉबर्ट हा ब्रिटनमधील तुरुंगात सर्वाधिक काळापर्यंत कैद राहिलेला गुन्हेगार आहे. काही काळापूर्वी त्याला काचेच्या बॉक्समध्ये कैद करण्यात आले आहे. चार हत्यांसाठी कुख्यात रॉबर्टला ‘हॅनिबल द कॅनिबल’ म्हटले जाते, परंतु त्याची प्रेयसी लवीनिया ग्रेस मॅकेनीच्या नजरेत तो एक कोलमडून पडलेला इसम आहे, ज्याला तुरुंगाचा नवा नियम हळूहळू मारून टाकत आहे. उपोषण, कोरोनाचा मार आणि 17 हजार दिवसांपर्यंत एकाकीपणा सहन केल्यावर रॉबर्ट आता पूर्णपणे कोलमडून गेला आहे. रॉबर्ट मॉड्सलीचे जीवन एखाद्या भयावह स्वप्नाप्रमाणे आहे.
तो लिव्हरपूलमध्ये 12 भावंडांदरम्यान लहानाचा मोठा झाला, त्याचे बालपण मारहाण अन् उपेक्षेने भरलेले होते. पित्याने त्याला 6 महिन्यापर्यंत एका खोलीत कैद करत दररोज मारहाण केली होती. एकेदिवशी सामाजिक संघटनांनी त्याला अनाथालयात पाठविले. परंतु पित्याकडून मिळालेली वेदना त्याच्या मनात ठाण मांडू राहिली. 1974 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी रॉबर्टने जॉन फॅरेलची हत्या केली होती. ज्यासाठी त्याला ब्रॉडमूर सिक्योर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले, परंतु हॉस्पिटलमध्ये देखील त्याने एका रुग्णाची हत्या केली. मग 1978 मध्ये वेकफील्ड तुरुंगात त्याने दोन कैद्यांची हत्या केली. या गुन्ह्यांमुळे त्याला तुरुंगातील सर्वात अंधारयुक्त कोठडीत ढकलले. यानंतर 1983 मध्ये मॉन्स्टर मेंशन म्हटले जाणाऱ्या मॉड्सली याला वेकफील्ड तुरुंगात एका 18 बाय 15 फूटांच्या काचेच्या कोठडीत कैद करण्यात आले. ही कोठडी ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’च्या हॅनिबल लॅक्टरसारखी होती. 23 तास एकाकी राहत पुस्तक वाचत अन् कविता करत तो राहायचा.
मारून खायचा मेंदू
हत्येनंतर तो मृतदेहातील मेंदू काढून खात होता असे बोलले जाते, याचमुळे त्याची प्रतिमा ‘हॅनिबल’ची निर्माण झाली. एप्रिल 2025 मध्ये त्याने टीव्ही आणि प्लेस्टेशन यासारखे विशेषाधिकार काढून घेतल्याने उपोषण सुरू केले होते. यानंतर त्याला कॅम्ब्रिजशायरच्या व्हाइटमूर तुरुंगाच्या एफ-विंगमध्ये पाठविण्यात आले, तेथे धोकादायक कैदी असतात. परंतु आता रॉबर्टची प्रेयसी लवीनिया मॅकेनी समोर आली आहे. 2020 मध्ये रॉबर्टवरील एक माहितीपट पाहून लवीनिया त्याच्याशी जोडली गेली. रॉबर्ट कोरोना-19मुळे दोनवेळा आजारी पडला, याचदरम्यान तुरुंगाचा नवा नियम टीव्ही-रेडिओ शिवाय 70 अन्य कैद्यांदरम्यान राहणे त्याला आतून तोडत असल्याचे ती सांगते. लवीनियाला रॉबर्ट पत्रही लिहितो. ही पत्रं तपासली जातात, मी उघडपणे लिहू शकत नसल्याचे रॉबर्टने लिहिले आहे. हा प्रकार अमानवीय असल्याचा लवीनियाचा दावा आहे.