For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत मोहम्मद युनूस विरोधात घोषणाबाजी

06:26 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत मोहम्मद युनूस विरोधात घोषणाबाजी
Advertisement

बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा विरोध

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस यांच्या विरोधात न्यूयॉर्कमध्ये घोषणाबाजी झ्घली आहे. निदर्शकांनी युनूस खान यांनी निघून जावे अशा घोषणा दिल्या आहेत. मोहम्मद युनूस हे 79 व्या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत भाग घेण्यासाठी सध्या अमेरिकेत पोहोचले आहेत. निदर्शकांनी बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांवरून युनूस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. शेख हसीना आमच्या पंतप्रधान असा मजकूर असलेला फलक निदर्शकांनी झळकविला आहे. शेख हसीना यांना देश सोडावा लागलयावर आणि संसद विसर्जित करण्यात आल्यावर युनूस यांनी 8 ऑगस्ट रोजी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली होती.

Advertisement

84 वर्षीय युनूस हे गलिच्छ राजकारण करून सत्तास्थानी आले असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. मोहम्मद युनूस यांनी घटनाबाह्या आणि अवैध मार्गाने सत्ता मिळविली आहे. त्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे अनेक लोक मारले गेले आहेत. युनूस हे बांगलादेशी लोकांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे आम्ही संयुक्त राष्ट्रसंघाला सांगू इच्छितो असे निदर्शकांनी म्हटले आहे.

अल्पसंख्याकांची पर्वा नाही

बांगलादेशात शांतता प्रस्थापित व्हावी अशी आमची इच्छा आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. बळाच्या जोरावर सत्ता प्राप्त करत युनूस हे हिंदू, ख्रिश्चनांची कत्तल घडवून आणत आहेत. हिंदूंची मंदिरे पेटवून देण्यात आली आहेत. बांगलादेशात लोक सुरक्षित नाहीत असा दावा निदर्शकांनी केला आहे.

बिडेन यांना भेटणार

युनूस हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत बैठक करणार आहेत. याचबरोबर अन्य विदेशी नेत्यांच्या ते गाठीभेटी घेणार आहेत. बांगलादेशचे मुख्य सल्लागार 27 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधित करतील. तर बांगलादेशचे विदेश विषयक सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली आहे.

Advertisement
Tags :

.