For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांदा-बटाटा दरात किंचित घसरण : रताळी दर थिर

06:03 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कांदा बटाटा दरात किंचित घसरण   रताळी दर थिर
Advertisement

भाजीमार्केटमध्ये परराज्यातून येणारा भाजीपाला आवक बंद : मटर आवक आटोक्यात

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा भाव क्विंटलला स्थिर आहे. तर बटाटा दरात मात्र 100 रुपयांनी उतार झाली आहे. सध्या बेळगाव जवारी बटाटा आवकेत वाढ झाल्याने इंदोर बटाट्याला मागणी कमी झाली आहे. जवारी बटाटा खरेदीकडे खरेदीदारांचा कल वाढला आहे. रताळी आवक मोजकीच असून भाव स्थिर आहे. गुळाचा भावदेखील स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये परराज्यातून येणारा भाजीपाला आवक बंद झाली आहे. केवळ बेंगळूरहून इंदस ढबू मिरची आणि बिन्स येत आहे. मध्यप्रदेशमधून शेवटच्या टप्प्यातील मटरची आवक येत असून मटर आटोक्यात आली आहे. भाजीपाल्याचे दर मात्र टिकून आहेत.

Advertisement

मागच्या आठवड्यातील शनिवार दि. 16 रोजी झालेल्या बाजारात कांदा भाव 500 ते 1800 तर काही ठिकाणी चुकून 1900 रुपये देखील झाला होता. इंदोर बटाटा भाव 1800 ते 2500 रुपये झाला होता. आग्रा बटाटा भाव 1500 ते 1900 रुपये झाला होता. तर बेळगाव जवारी बटाटा भाव 500 ते 2700 रुपये, रताळी भाव 800 ते 1800 रु. तर गुळाचा भाव 4500 ते 5000 रु. प्रमाणे क्विंटल दर झाले होते.

बुधवार दि. 20 रोजी झालेल्या बाजारात एपीएमसीमध्ये कांदा भाव 500 ते 1800 रु., पांढरा कांदा 500 ते 1500 रु., इंदोर बटाटा भाव 1500 ते 2400 रु., आग्रा बटाटा भाव 800 ते 1600 रु. रताळी भाव 800 ते 2000 रु. बेळगाव जवारी बटाटा भाव 500 ते 2500 रु., गुळाचा भाव 4400 ते 4800 रु. भाव झाला होता. आज दि. 23 रोजी झालेल्या मार्केट यार्डमधील कांदा, बटाटा, रताळी, बटाटा लिलाव पुढीलप्रमाणे झाले. महाराष्ट्र कांदा 500 ते 1800, पांढरा कांदा 500 ते 1500 रु., इंदोर बटाटा 1500 ते 2300 रु., आग्रा बटाटा 1200 ते 1800 रु., बेळगाव जवारी बटाटा 500 ते 2600 रु., रताळी भाव 1000 ते 1200 रु., गुळाचा भाव 4500 ते 5000 रु. दर झाले आहेत.

31 मार्चनंतर काय होणार?

चार-पाच महिन्यापूर्वी कांदा दरात वाढ होऊन 4000 ते 6000 क्विंटल भाव झाला होता. दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने परदेशामध्ये निर्यात होणारा कांदा पूर्णपणे स्थगित करण्याचा निर्धार केला आहे. 31 मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा निर्यातीवर बंदी घालून 1 एप्रिलनंतर निर्यातीला परवानगी देणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने केले आहे. सध्या महाराष्ट्रातील कांदा केवळ भारतामध्येच विकला जात आहे. गेल्या एक महिन्यापासून कांद्याचा भाव स्थिर आहे. 1 एप्रिलनंतर कांदा परदेशामध्ये निर्यात होणार असून यावेळी कांदा भाव काय होणार याकडे शेतकरी व्यापारी व खरेदीदारांचे लक्ष लागून आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.

Onion

उत्तम दर्जाचा कांदा बाजारात

महाराष्ट्रामधील पहिल्या टप्प्याचा कांदा सुरुवात डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे. सुरुवातीला कांदा कच्चा व काही खराब दर्जाचा येत असे. मात्र शेतकऱ्यांनी यंदा उत्तम दर्जाचे उत्पादन घेतले आहे. कांद्याची काढणी करून योग्य पद्धतीने कांदा कटींग करून उन्हामध्ये वाळवल्याने कांदा उत्तम दर्जाचा बाजारात येत आहे. गोळा-मिडीयम, मोठवड गोळा जोड अशा अनेकप्रकारे कांदा शेतकरी निवडून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

इंदोर बटाटा 100 रुपांनी उतरला

एकीकडे इंदोरमध्ये बटाटा आवकेत टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या 15 दिवांपासून बटाटा भाव 2300 ते 2500 रुपयेप्रमाणे बेळगावात विक्री होत आहे, असे असताना सध्या बेळगाव मार्केट यार्डमध्ये तालुक्यातील उन्हाळी जवारी बटाटा विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये येत आहे. नवीन बटाटा खरेदीसाठी खरेदीदार जवारी बटाट्याकडे वळले आहेत. कारण जवारी बटाटा खाण्यासाठी चवदार असतो. वेफर्स बनवण्यासाठी देखील उत्तम दर्जाचा असतो. यामुळे इंदोर बटाटा खरेदीकडे खरेदीदार अल्प प्रतिसाद करीत आहेत. यामुळे इंदोर बटाटा शंभर रुपयांनी कमी झाला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रताळ्याची आवक मोजक्याच प्रमाणात आली होती. गुळाचा भाव देखील स्थिर आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.Onion, potato and yam prices remained stable per quintal

भाजीपाला भाव स्थिर

सध्या पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला असला तरी भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर मात्र स्थिर आहेत. इतर राज्यामध्ये भाजीपाला दर वाढले आहेत. बेळगाव भाजी मार्केट गोवा, कोकणपट्टा व बेळगाव परिसरातील खरेदीदारावर अवलंबून आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपाला भाजीमार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. येत्या पुढील दिवसामध्ये भाजीपाला भाव वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.