आकाशात लटकणारी इमारत
बुर्ज खलिफापेक्षा अधिक असणारी लांबी
जगात उंच इमारतींमध्ये सर्वात पहिले नाव बुर्ज खलिफाचे येते. दुबईतील बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर असून यात 163 मजले आहेत. परंतु बुर्ज खलिफापेक्षाही अधिक उंची असणारी इमारत आता साकारली जाणार आहे.
या इमारतीचे नाव एनालेम्मा टॉवर असेल, परंतु ही इमारत सध्या केवळ इंजिनियर्सची कल्पनाच आहे. जगातील आतापर्यंतच्या सर्वात उंच गगनचुंबी इमारतींपेक्षा खूपच वेगळी असणार आहे.
एनालेम्मा टॉवरचा प्रस्ताव अमेरिकन कंपनी क्लाउड्स आर्किटेक्चरकडुन 2017 मध्ये मांडण्यात आला. सर्वात खास बाब म्हणजे ही जगातील सर्वात पहिली आकाशात लटकलेली इमारत असणार आहे. क्लाउड्स आर्किटेक्चरने ही इमारत केबल्सद्वारे आकाशात लटकलेली असेल असा प्रस्ताव मांडला आहे. क्लाउड्स आर्किटेक्चरने या इमारतीची निर्मिती दुबईत करण्याचा प्रस्ताव मांडला होता, यात वीज स्पेस बेस्ड सोलर पॅनेल्स आणि पाण्याची गरज पावसाच्या पाण्याने पूर्ण होईल. एस्टेरॉइडच्या प्रदक्षिणेमुळे इमारत देखील पृथ्वीच्या चहुबाजूला प्रदक्षिणा घालत राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या इमारतीची लांबी 38 किलोमीटरपर्यंत असू शकते. एनालेम्मा टॉवरला केबल्सद्वारे एस्टेरॉयडला बांधून पृथ्वीच्या दिशेने लटकविले जाईल. अशाप्रकारे ही इमारत नेहमी आकाशात लटकलेली असेल, एनालेम्मा टॉवर सध्या केवळ इंजिनियर्सची कल्पना आहे. जर ही इमारत प्रत्यक्षात साकारली गेली तर अत्यंत मोठी गोष्ट ठरणार आहे.