For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : शेतकरी महिला सूतगिरणी निवडणुकीत शेकापचे एकहाती वर्चस्व

02:13 PM Jan 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
solapur   शेतकरी महिला सूतगिरणी निवडणुकीत शेकापचे एकहाती वर्चस्व
Women Spinning Mills Election Solapur
Advertisement

विरोधी उमेदवारांचा दारुण पराभव...सर्व २१ जागांवर विजय

सांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणी च्या पंचवार्षिक निवडणुकीत आज सोमवार दि.८ जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीत शेतकरी कामगार पक्षाचे १९ उमेदवार मोठया मताधिक्याच्या फरकाने निवडून आले आहेत या निवडणुकीत अगोदरच शेकापच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने २१ पैकी २१ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे.

Advertisement

निवडून आलेले विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे.. कापूस उत्पादक शेतकरी महिला संघातून बाबर वंदना तानाजी ८०१ पाटील शुभांगी सयाजीराव ८०१, हजारे शालन महादेव ७९३, रसाळ शोभा सुरेश ७९३, वाघमोडे उज्वला संजय ७९३, बंडगर विमल सुबराव ७८९ , खतीब शबाब जमीद ७८९ ,पाटील मालन विष्णू ७८९, मदने सुरेखा संजय ७८५ , कोळेकर छाया सोपान ७७५, यमगर मायाक्का मायाप्पा ७७५,बिगर कापूस उत्पादक शेतकरी महिला मतदार संघ.. ढोबळे प्रतिभा शिवाजीराव २६८, जोशी नम्रता नागेश २६७ , भगत द्रोपती सोपान २६३ , मिसाळ गोकुळाबाई ज्ञानेश्वर २६१,रुपनर आनंदीबाई रंगनाथ २६०, सहकारी संस्था मतदारसंघातून उषा रवींद्र देशमुख तर कल्पना प्रकाश शिंगाडे या भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग महिला मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहे,अनुसूचित जाती जमाती महिला राखीव मतदार संघातून बनसोडे रतन संभाजी ११४१ तर बनसोडे स्मिता किशोर ११५६ मताने निवडून आले आहेत तसेच इतर मागासवर्गीय महिला प्रतिनिधी मतदारसंघातून राजश्री रामचंद्र जाधव या निवडून आल्या आहेत.

शेतकरी महिला सूतगिरणीच्या निवडणुकी च्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संस्था मतदारसंघातून व भटक्या विमुक्त मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज आल्याने शेकापचे दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १९ जागांसाठी रविवार दि.७ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती आज सोमवार दि.८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व १९ उमेदवार बहुमताने निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत टीकुळे यांनी जाहीर केले. शेखपचे सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिशबाजी करीत गुलालाची मुक्तपणे उधळण केली तर सर्व विजयी उमेदवाराचे डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.