For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्कोडा एरलोक ईव्ही जागतिक बाजारात लाँच

06:11 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्कोडा एरलोक ईव्ही  जागतिक बाजारात लाँच
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

झेक प्रजासत्ताक कार निर्माता स्कोडा ऑटोने जागतिक बाजारपेठेत आपली प्रमुख इलेक्ट्रिक एसयुव्ही एरलोकचे अनावरण केले. एरलोक हे स्कोडाचे नवीन ‘मॉडर्न सॉलिड’ डिझाइन लँग्वेज असलेले पहिले मॉडेल आहे. स्कोडा एरलोक एका पूर्ण चार्जवर 560 किलोमीटरपेक्षा जास्त धावेल असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक कारमध्ये रीअरह्यू कॅमेरा, क्रू प्रोटेक्ट असिस्ट, साइड असिस्ट, 13-इंच इन्फोटेनमेंट आणि स्मार्टलिंक यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असणार असल्याचे समजते.

एरलोक ही स्कोडाची मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटमधील पहिली इलेक्ट्रिक कार आहे, जी 2025 मध्ये येणाऱ्या फ्लॅगशिप एनिक आयव्ही आणि इपिक कॉम्पॅक्ट ईव्हीमध्ये असेल. ही कार युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि पुढील वर्षी भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता कंपनीने बोलून दाखवली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.