For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

रत्न उद्योगात कुशल मनुष्यबळाचे योगदान महत्त्वाचे

06:24 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
रत्न उद्योगात कुशल मनुष्यबळाचे योगदान महत्त्वाचे

लोकसभा निवडणुकांची घोषणा अगदी नजीक आलेली असताना रत्नागिरीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पोलीस वसाहत भूमीपूजन शुभारंभ आयोजित करण्यात आल़ा एका बाजूला शासकीय काम मार्गी लावण़े त्याचबरोबर अशा कार्यक्रमांचा पक्षाला लाभ करुन घेणे असे दोन्ही हेतू ठेवून कार्यक्रमाची रचना करण्यात आल़ी आचारसंहिता लागण्यापूर्वीचा कोकणातील मोठा कार्यक्रम म्हणून त्याकडे पाहण्यात येत़े

Advertisement

  रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन व पोलीस वसाहतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, या सोहळ्याला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ज्या कोठडीत बंद केले होते त्या कोठडीला फडणवीस यांनी भेट दिली. रत्नागिरी विशेष कारागृहाच्या मजबुतीकरणासाठी निधी शासनाने उपलब्ध करून दिला. त्या कामाचे भूमीपूजन  त्यांच्या हस्ते झाले. मागील सरकारच्या अडीच वर्षात केवळ आश्वासनेच मिळाली. निधी मिळत नसल्याने अखेर भाजपा सोबत आल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी जो शब्द टाकला तो शब्द आम्ही पूर्ण केल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 24 तास जनतेसाठी सेवा करणाऱ्या पोलीस अंमलदारांची अनेक ठिकाणची निवासस्थाने  काही ठिकाणी ब्रिटिशकालीन आहेत. त्यामुळे पोलिसांनीही उत्तम दर्जाच्या वसाहतीत रहावे यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला.

अलीकडे तंत्रज्ञान विकसित होत असताना सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये जनतेची आर्थिक फसवणूक होण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यासाठी सर्व बँकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून सायबर गुह्यातील फसवणूक रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी एलएनटीसोबत करार  करण्यात आले आहेत. ते नवी टेक्नॉलॉजी विकसित करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Advertisement

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या सर्वोच्च संस्थेने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्न आणि दागिन्यांच्या प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्रासाठी रत्नागिरी येथे सामंजस्य करार झाल़ा रत्नागिरीतील या प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्रात स्थानिकांना या उद्योगाशी संबंधित कौशल्य शिकवले जाईल. ज्या योगे, रोजगाराच्या संधी तर निर्माण होतीलच, पण या प्रदेशात आर्थिक विकासालाही चालना मिळेल. या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे, दागिने तयार करण्याशी संबंधित वेगवेगळ्dया क्षेत्रांचे प्रशिक्षण देणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे, उद्योजकतेला चालना देणे आणि हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जीजेईपीसीच्या सहकार्याने आम्ही नवी मुंबईत भारतातील सर्वात प्रगत जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारत आहोत. अशा प्रकारच्या या पहिल्याच ज्वेलरी पार्कमुळे राज्यात जवळपास 1 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील व ही संधी महाराष्ट्राच्या विविध भागातील लोकांपर्यंत पोहोचवायची आमची इच्छा आहे. जीजेईपीसीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून आम्ही रत्नागिरीत विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र सुरू करत आहोत. यामुळे राज्याच्या विविध भागांतील तऊण व प्रतिभावंतांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातून होणाऱ्या निर्यातीमध्ये रत्ने व दागिन्यांचा मोठा वाटा आहे. हीच आम्हाला प्रतिभा वाढवायची असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, रत्न आणि दागिन्यांच्या व्यवसायात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे आणि अशा उपक्रमांमुळे त्याचे हे नेतृत्व टिकवून ठेवण्यास मदत होईल. रत्नागिरी प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्र दोन महिन्यात सुरू होईल आणि संस्थेत पहिल्या 3 वर्षांत प्रवेश घेणाऱ्या 1,500 विद्यार्थ्यांना नवी मुंबईतील आगामी इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये निश्चित रोजगार मिळेल. रत्न व दागिने निर्यात उद्योग, ज्याचे मूल्य सध्या 40 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. ते भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. देशाच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत याचे योगदान 9 टक्के आहे आणि हे क्षेत्र 4.3 दशलक्ष लोकांना रोजगार देते. वाढती जागतिक मागणी लक्षात घेता, तसेच 2030 पर्यंत 75 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या मूल्याची निर्यात साध्य करण्यासाठी या उद्योगाला अधिक कुशल मनुष्यबळ व कौशल्याची आवश्यकता आहे. रत्नागिरीमध्ये प्रशिक्षण आणि कौशल्य केंद्राची स्थापना हा या ध्येयपूर्तीचाच एक प्रयत्न आहे, असे पेंद्र सरकारच्यावतीने सांगण्यात आल़े

बाजारातील गरजा आfिण उपलब्ध मन्युष्यबळ यांची सांगड घालून प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केले गेले तर गरजा असलेल्या क्षेत्रात प्रतिभाशाली माणसांना काम करण्याची संधी मिळू शकेल़ आजवर हिरे व अन्य दागिन्यांसाठी मुंबई शहराला महत्त्वाचे स्थान देण्यात आले होत़े त्या खालोखाल गुजरामध्ये या क्षेत्रातील मनुष्यबळ विकासासाठी मोठमोठ्या प्रशिक्षण संस्था चालविल्या जात आहेत़ कोकणात मात्र अशी सरकारी प्रशिक्षण संस्था आजवर नव्हत़ी पण ती पुढील काळात आकारास यावीत, म्हणून पावले पडू लागली आहेत़ यापूर्वी रत्नागिरी, गुहागर, दापोली तालुक्यातील अनेक कुशल कामगार मुंबईत हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात सहभागी झाल्याचे दाखले आहेत़ जुन्या काळामध्ये औपचारीक प्रशिक्षण घेण्याऐवजी कामात सहभागी होऊन कौशल्याची वाढ करण्याची परंपरा होत़ी त्याचप्रकारे कोकणातील लोक हिऱ्यांवर पैलू पाडण्याच्या उद्योगात सहभागी झाले होत़े भविष्यकाळात प्रशिक्षित मनुष्यबळ येथे तयार होईल, अशी शक्यता दिसू लागली आह़े

भविष्यकाळाचा वेध घेऊन येणाऱ्या कालावधीतील आव्हाने कोणती याचा विचार राजकीय नेतृत्व जोवर करत नाही तोवर शिक्षण व प्रfिशक्षण क्षेत्रात मोठी झेप घेण़े लोकशाही व्यवस्थेत अडचणीचे ठरत़े हिरे प्रक्रिया व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळ उभारणे आवश्यक आह़े यासाठी पावले पडत आहेत़ ही बाब चांगली आह़े

सुंकांत चक्रदेव

Advertisement
Tags :
×

.