महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेरोजगार भत्त्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षण

06:38 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या : पाचवी गॅरंटी योजना ‘युवानिधी’च्या नोंदणी प्रक्रियेला चालना

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

युवानिधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या पदवी आणि डिप्लोमाधारकांना बेरोजगार भत्त्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षणही देऊन नोकरी मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.

विधानसौध येथे मंगळवारी काँग्रेस सरकारची पाचवी गॅरंटी योजना ‘युवानिधी’च्या नोंदणी प्रक्रियेला चालना दिल्यानंतर ते बोलत होते. राज्यात 2.20 लाख पदवीधर आहेत. तर 48 हजार जण डिप्लोमाधारक आहेत. या सर्वांना बेरोजगार भत्ता देण्यासाठी मार्च अखेरपर्यंत 250 कोटी रुपये अनुदानाची आवश्यकता असून तितक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. युवानिधी योजनेबरोबरच मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. युवानिधी योजनेसाठी अर्जही नि:शुल्क आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

युवानिधी योजनेंतर्गत 2022-23 या वर्षात उत्तीर्ण होऊन सहा महिन्यापर्यंत कोणताही रोजगार न मिळालेल्या पदवीधर, डिप्लोमाधारकांना बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. 2022-23 हे शैक्षणिक वर्ष संपून सहा महिने उलटले आहेत. आता योग्य वेळी ही योजना जारी केली जात आहे. या योजनेला विलंब झालेला नाही. दोन वर्षापर्यंत बेरोजगार भत्ता देऊन युवा वर्गाला स्वावलंबी बनविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींवर निशाणा

आपल्या भाषणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. काँग्रेसला गॅरंटी योजना जारी करणे शक्य नाही. एखाद्या वेळेत जारी झाल्या तर राज्य सरकारचे आर्थिकदृष्ट्या दिवाळे निघेल, अशी टीका पंतप्रधानांनी राजस्थान येथील निवडण्tक प्रचारावेळी केली होती. मोदी हे अर्थतज्ञ आहेत का?, असा प्रश्न उपस्थित करून सिद्धरामय्या यांनी आम्ही पाचही गॅरंटी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यानंतरही राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, असे सांगितले.

पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 10 वर्षात 20 कोटी रोजगार मिळायला हवे होते. तितके रोजगार केंद्राने उपलब्ध केले का?, असा प्रश्न सिद्धरामय्यांनी उपस्थित केला. विदेशातून काळापैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रु. जमा करण्याची घोषणा मोदींनी केली होती. मात्र, मोदींनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशी टिकाही सिद्धरामय्यांनी केली.

12 जानेवारीला योजनेचे उद्घाटन : शिवकुमार

येत्या 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीदिनी शिमोगा येथे युवानिधी योजनेचे उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. या कार्यक्रमाविषयी आपण पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी चर्चा करत आहे. आम्हाला अधिकार दिलेल्या जनतेचे ऋण फेडण्याचे काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

पाच

Advertisement
Next Article