For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तासगावमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करणार

04:25 PM Jan 11, 2025 IST | Radhika Patil
तासगावमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करणार
Advertisement

तासगाव : 

Advertisement

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील दोन्ही तालुक्यामध्ये लवकरच कौशल्य केंद्रे सुरु करण्याची ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली, अशी माहिती आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी दिली. या मागणीसाठी आमदार रोहित पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत मंगलप्रभात यांची भेट घेतली.

सार्वजनिक-खाजगी भागिदारी (पीपीपी) मॉडेलद्वारे कौशल्य विकासासाठी खाजगी क्षेत्रातील उपक्रमांना बळ देणे, समर्थन देणे आणि समन्वय साधणे यासाठी तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यात व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांची लवकरंच उभारणी होईल, अशी माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, ’पीपीपी’ माध्यमातून खाजगी क्षेत्राकडून लक्षणीय ऑपरेशनल आा†ण आर्थिक सहभागासाठी प्रयत्न करणे. विद्यार्थ्यांना प्रा†शा†क्षत करणे. सेवा, उत्पादन, कृषी व संल सेवा यासाठी चालना मिळणार आहे. सरकारने उच्च प्राधान्य क्षेत्रे आणि मेक इन इंडिया उपक्रमांच्या अंतर्गत 25 क्षेत्रांचा समावेश केलेला आहे. यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया (एनएसडीसी) ही एक प्रकारची सार्वजनिक खाजगी भागीदारी कंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे.

Advertisement

लवकरच तासगाव आणि कवठेमहांकाळ येथे कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यासाठी योग्य आणि आवश्यक कार्यवाही करा, असे निर्देश मंगलप्रभात लोढा यांनी अधिका-यांना दिले. याशिवाय तासगाव आा†ण कवठेमहांकाळ येथील औद्योा†गक प्रशिक्षण संस्थांना अपग्रेड करण्याची ग्वाही लोढा यांनी दिल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.

  •  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी

याबाबत आमदार पाटील म्हणाले, बेरोजगारी ही माझ्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी योगेवाडी-मणेराजुरी मिनी एमआयडीसीचे काम लवकर सुरु होणार आहे. याशिवाय कौशल्य विकास केंद्रे सुरु झाल्यानंतर मतदार संघातील विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी देणार आहे.

Advertisement
Tags :

.