For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रसाद नाकाडी संघाकडे एसकेई चषक

10:12 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रसाद नाकाडी संघाकडे एसकेई चषक
Advertisement

इ संघ उपविजेता

Advertisement

बेळगाव : साऊथ कोंकण एज्युकेशन सोसयटीच्या कर्मचारी वर्गाची क्रिकेट स्पर्धेत प्रसाद नाकाडी संघाने देवंद्र कुडची संघाचा 5 गड्यांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. प्रसाद नाकाडीला मालिकावीर तर संतोष बुवाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आरपीडी मैदानावर  14 आणि 15 जानेवारी रोजी कर्मचारी वर्गाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपांत्य फेरीच्या सामन्यातून  प्रसाद नाकाडी संघाने रामकृष्ण संघाचा तर देवेंद्र कुडची संघाने प्रशांत मनकाळे संघाचा पराबव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात देवेंद्र कुडची संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडीबाद 66 धावा केल्या. श्रीनिवास शिवंनगेकर  23 व शशांकने 14 धावां केल्या. प्रसाद नाकाडी तर्फे संतोष बुवाने 2 तर प्रसाद नाकडीने 1 गडी बाद केला. प्रत्यूतरादाखल खेळताना प्रसाद नाकाडी संघाने 7.5 षटकात 5 गडीबाद 67 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात प्रसाद नाकाडीने 21, संतोष बुवाने 17 धावा केल्या. अंतिम सामन्यानंतर  प्रमुख पाहुणे म्हणून संजय शिंदे, बाबू धोपे,  सुधीर राजगोळी, नागेंद्र हलगेकर, शिमणगौडर व प्रशांत मंकाले, डॉ. रामकृष्ण एन. हस्ते  विजेत्या संघाला आकर्षक चषक व पदके देऊन गौरवण्यात आले. सामनावीर पुरस्कार संतोष बुवा व मालिकावीर पुरस्कार प्रसाद नाकाडी व श्रीनिवास शिवनगेकर यांना विभागून देण्यात आला. या वेळी साखळी सामन्यातील सामनावीर पुरस्कारही देण्यात आले. यावेळी बाजीराव शिंदे, प्रा.अरविंद हलगेकर यांदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.