महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संसद घुसखोरी प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक

06:37 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जाळलेल्या मोबाईलचे अवशेष पोलिसांच्या हाती : तपासातून महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्यात यश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संसद सुरक्षा भंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एक आरोपी महेश कुमावतला अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तपास पथकाने आरोपीचा जळालेला मोबाईल फोन, कपडे आणि बूट यांचे अवशेषही जप्त केले आहेत. महेश कुमावतचे इन्स्टाग्राम खाते डीकोड करून तपास पथकाने अनेक खुलासे केले आहेत. त्याच्यावर तऊणांना भडकावण्याचा तसेच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे ब्र्रेनवॉश केल्याचा आरोप आहे. तो आपल्या इन्स्टाग्रामवरून क्रांतिकारकांची छायाचित्रे पोस्ट करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

लोकसभा घुसखोरीप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 13 डिसेंबर रोजी चौघांना पकडल्यानंतर सूत्रधार ललित झा याने 14 डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले. याप्रकरणी विकी शर्मा आणि त्याची पत्नी राखी यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. आता आणखी एक आरोपी महेश कुमावत याला जेरबंद करण्यात आले असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

महेश कुमावत याने मास्टरमाईंड ललित झा याला लपून राहण्यास मदत केली होती. संसदेतील सुरक्षा कडे तोडण्याच्या कटात महेश कुमावत याचाही मोठा वाटा आहे. तो केवळ आरोपींना रसद पुरवत नव्हता तर या गटात आणि कटातही त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे इन्स्टाग्राम पोस्टवरून उघड झाले आहे. तसेच संसदेबाहेर आत्मदहनाचाही आरोपींचा कट होता. गुगलच्या माध्यमातून आरोपींनी संसदेच्या आजूबाजूच्या परिसराची रेकी केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यांना अनेक गोष्टींची जाणीव होती. एवढेच नाही तर संसदेतील सुरक्षा व्यवस्था जाणून घेण्यासाठी त्यांनी जुने व्हिडिओही पाहिले.

अनेक दिवसांपासून नियोजन

ललित झा हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड होता. सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले होते आणि एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. ही घटना घडवण्यासाठी हे लोक अनेक दिवसांपासून नियोजन करत होते, असे दिल्ली पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी एक-दोन नव्हे तर 7 स्मोक पॅन (धूर पसरवण्याचे उपकरण) नेल्याचेही स्पष्ट झाले आहे.

चौकशीत अनेक खुलासे

पोलिसांच्या चौकशीत या आरोपींनी अनेक खुलासे केले. आपण मार्च 2023 मध्ये संसद भवनात सुरक्षेसंबंधीची रेकी करण्यासाठी गेल्याचे संसदेत अटक करण्यात आलेल्या मनोरंजन डी याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर घुसखोरीची योजना आखण्यात आली. आपल्या मार्चमधील संसदेतील भेटीवेळी सागर शर्मालाही सोबत यायचे होते, मात्र त्याला पास मिळाला नाही, अशी कबुलीही त्याने दिली. तसेच सभागृहात जाण्यापूर्वी कसून तपासणी केली जाते, परंतु शूजची तपासणी होत नसल्याच्या कारणास्तव या लोकांनी आपल्या चपलांमध्ये धुराच्या कांड्या ठेवल्याचेही चौकशीत स्पष्ट करण्यात आले..

राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

दरम्यान, बेरोजगारी आणि महागाईमुळे संसदेतील घुसखोरीची घडल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. त्यांना संसद सुरक्षेतील त्रुटींबाबत प्रŽ विचारण्यात आला. त्यावर सुरक्षेचा भंग झाला आहे, पण असे का झाले? सध्या देशासमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. मोदींच्या धोरणांमुळे देशातील तऊणांना रोजगार मिळत नाही. त्यामुळेच अशा घटना वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article