व्यवहारातील सहा नियम 1 जुलैपासून बदलणार
रेल्वे प्रवासासह, पॅनकार्ड, व्यावसायिक गॅस संदर्भात नियम बदलणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दैनंदिन व्यवहारामध्ये 1 जुलैमपासून 6 मोठे बदल होत आहेत. यामध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ ते रेल्वे प्रवासाचा खर्च वाढणे यांचा समावेश आहे. जुलै महिन्यापासून या नव्या नियमांची अमंलबजावणी होणार आहे. या नव्या बदलासंदर्भात थोडक्यात पुढील प्रमाणे जाणून घेऊया.
- रेल्वे प्रवास महाग: 1000 किमी प्रवासासाठी एसीमध्ये 20 रुपये जास्त रेल्वे प्रवासासाठी द्यावे लागणार आहेत. नॉन-एसी मेल/एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैसे आणि एसी क्लासचे भाडे प्रति किलोमीटर 2 पैसे वाढवण्यात आले आहेत.
2.तात्काळ तिकीट बुकिंग: आधार आयआरसीटीसी खात्याशी लिंक केले जाईल. तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी, प्रवाशांना आता आधारसह डिजिटल व्हेरिफिकेशन करावे लागेल. म्हणजेच, तुम्हाला तुमचा आधार आयआरसीटीसी खात्याशी लिंक करावा लागेल. आधार व्हेरिफिकेशन केलेल्या वापरकर्त्यांना तिकीट बुकिंग दरम्यान ओटीपी मिळेल, जो पडताळणी पूर्ण करू शकेल आणि तिकीट बुक करू शकेल.
3.पॅन कार्ड : सरकारने पॅन कार्डचे नियम बदलले आहेत. 1 जुलै 2025 पासून पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधारकार्ड अनिवार्य झाले आहे. या शिवाय आधार कार्ड काढता येणार नाही.
4.युपीआय व्यवहार: एनपीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे. या अंतर्गत वापरकर्त्याला युपीआय पेमेंट करताना फक्त अंतिम लाभार्थीचे बँकिंग नाव म्हणजेच प्रत्यक्ष प्राप्तकर्त्याचे बँकिंग नाव दिसेल. क्यूआर कोड किंवा संपादित नाव आता प्रदर्शित केले जाणार नाही. हा नियम 30 जून रोजी सर्व युपीआय अॅप्सवर लागू करण्यात आला आहे.
5.एमजी कार महागली : कंपनीने किंमती 1.5 टक्केपर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे आता एमजी कार खरेदीचा विचार असेल, तर जादा पैसे द्यावे लागणार आहेत.
6.गॅस सिलिंडर स्वस्त: 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 58.50 ने स्वस्त झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत 1665 पर्यंत कमी झाली आहे. पूर्वी किंमत 1723.50 होती. मुंबईत किंमत 1616.50 आहे, जी 1674 वरून 58 ने कमी झाली आहे.