महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थानात अपघातात सहा पोलिसांचा मृत्यू

06:28 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस व्हॅनची ट्रकला धडक : पंतप्रधानांच्या सभेसाठी झुंझुनूला जात असताना दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ झुंझुनू

Advertisement

राजस्थानमधील झुंझुनू येथे भीषण रस्ता अपघात झाला. पंतप्रधानांच्या रॅलीसाठी निघालेल्या सहा पोलिसांचा रविवारी पहाटे चुरू जिल्ह्यात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. व्हीआयपी ड्युटीसाठी झुंझुनूला जाणाऱ्या पोलिसांच्या कारची जिह्यातील सुजानगढ सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रकला धडक बसली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमी पोलिसांना ऊग्णालयात दाखल केले.

झुंझुनू येथील पंतप्रधानांच्या निवडणूक रॅलीत नागौरच्या खिनवसार पोलीस ठाण्यातील सहा पोलीस आणि महिला पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी सुरक्षा ड्युटीवर होते. सर्व पोलीस कर्मचारी झायलो कारमधून झुंझुनूला जात असताना राष्ट्रीय महामार्ग 58 वर सुजानगढ सदर पोलीस ठाण्याच्या कनुटा चौकीजवळ त्यांची ट्रकला धडक बसली. पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

खिंवसर पोलीस स्टेशनचे एएसआय रामचंद्र, कॉन्स्टेबल कुंभारम, सुरेश मीणा, थानाराम आणि महिला पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल महेंद्र अशी या अपघातात जागीच मृत्यू झालेल्या पोलिसांची नावे आहेत. या अपघातात खिंवसर पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबलसह कॉन्स्टेबल सुखाराम जखमी झाले. दोघांनाही  अधिक उपचारार्थ जोधपूरला रेफर करण्यात आले. जोधपूरला नेत असताना कॉन्स्टेबल सुखारामचाही मृत्यू झाला. डीजीपी उमेश मिश्रा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article