विजापुरात सहाजण नदीत बुडाल्याची शक्यता
विजापूर : जुगार खेळत असलेल्या टोळक्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर पसार होण्याच्या प्रयत्नात असलेले सहाजण नदीत बुडाल्याची शक्यता आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी विजापूर जिल्ह्याच्या कोल्हार तालुक्यातील जुने बळुती येथे कृष्णा नदीकाठी घडली आहे. मृत कोल्हार शहरातील असल्याचे समजते.
जुने बळुती येथे नदीकाही काहीजण जुगार खेळत होते. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. त्यामुळे पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी तरफमधून नदी पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे काही अंतरावर तरफ उलटल्याने सहाजण बुडाले तर दोघेजण पोहून नदीकाठावर सुरक्षितपणे पोहोचल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन जवान आणि स्थानिक मच्छीमारांनी मृतदेहांचा शोध सुरू केला. घटनास्थळी विजापूर जिल्हा पोलीसप्रमुख ऋषिकेश सोनवणे, एएसपी शंकर मारिहाळ यांनी भेट देऊन माहिती घेतली.