Solapur : पंचायत समितीच्या सहा जागा महिलांसाठी राखीव
06:33 PM Oct 14, 2025 IST
|
NEETA POTDAR
Advertisement
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बारा पंचायत समिती आरक्षण जाहीर
Advertisement
दक्षिण सोलापूर : अनेक दिवसांपासून प्रशासकराज असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बारा पंचायत समिती गणासाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. पंचायत समितीच्या सहा जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
Advertisement
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बारा पंचायत समिती गणासाठी रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रांतधिकारी सुमित शिंदे आणि तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थित आरक्षण काढण्यात आले.
यावेळी बोरोनोको प्रशालेतील सुमित शिंदे, सुशील काळे या मुलांच्या हातून चिड्डी काढण्यात आली.
हत्तूर, औराद, कुंभारी, कासेगाव-सर्वसाधारण, मंद्रूप-ओबीसी, कंदलगाव व होटगी-सर्वसाधारण महिला, भंडारकवठे- अनुसूचित जमाती महिला, निंबर्गी-अनुसूचित जाती महिला, वळसंग : अनुसूचित जाती, धोत्री व बोरामणी: ओबीसी महिला.
Advertisement
Next Article