For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा लाख चोरीचा 24 तासांत छडा

12:05 PM Sep 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
सहा लाख चोरीचा 24 तासांत छडा
Advertisement

पणजीतील हॉटेलात घडली घटना : हैदराबाद, तेलंगणातील संशयितांना अटक 

Advertisement

पणजी : पणजीतील हॉटेल ट्री हाऊस नेपच्यूनच्या एका खोलीतून तब्बल 5 लाख 70 हजार ऊपयांच्या चोरीचा प्रकार घडला. याबाबत पणजी पोलिस ठाण्यात तक्रार येताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत हैदराबाद व तेलंगणातील  संशयितांना चोवीस तासांत अटक करण्यात यश मिळविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 9 रोजी सकाळी बारा ते दुपारी 3 या वेळेत हॉटेल ट्री हाऊस नेपच्यून येथील खोली क्रमांक 101 या ठिकाणाहून सुमारे 5 लाख 70 हजार ऊपये चोरीस गेले. या चोरीची तक्रार बालनगरा, कुकटपल्ली, हैदराबाद येथील मदुगुला कार्तिक यांनी पोलिसात दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हॉटेलमधील तसेच रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा माग सुरू केला. त्यानंतर गोव्याबाहेर पसार होण्यापूर्वीच दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. थुमू रामनाथ रवितेजा (रा. समनथनगर, सुभाषनगर हैदराबाद) तर शेख अब्दुल कलाम अशरफ (रा. पोस्ट ऑफिसजवळ तिऊमलयपल्लम, तेलंगण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

मदुगुला कार्तिक यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी मदुगुला कार्तिक यांच्याशी मैत्री केली होती. त्यानंतर या संशयित तक्रारदार मदुगुला कार्तिक यांच्या खोलीत राहिले. त्यानंतर संशयितांनी मदुगुला कार्तिक यांच्या हॉटेलऊममधील बॅगेतून 5 लाख 70 हजार ऊपये घेऊन पलायन केले. चोरीचा संशय येताच याची रितसर तक्रार पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांविऊद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305 आर/डब्ल्यू 3(5) अंतर्गत तक्रार नोंद करून घेतली. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पणजीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर, पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक, हवालदार चालक विकास नाईक यांनी चोरीचा छडा लावत संशयितांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement

सीसीटीव्ही फुटेज ठरला आधार

पणजीतील हॉटेलमधून 5 लाख 70 हजार ऊपयांची चोरी होताच या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. याप्रकरणी एक पथक नेमून पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी चोरट्यांचा शोध घेतला. चोरटे ज्या रस्त्यावरून गेले, त्याचा मागमूस येताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले.

Advertisement
Tags :

.