For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॉलमधील चाकूहल्ल्यात ऑस्ट्रेलियात सहा ठार

06:58 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॉलमधील चाकूहल्ल्यात ऑस्ट्रेलियात सहा ठार
Advertisement

महिला पोलिसाकडून हल्लेखोराचा खात्मा

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी चाकूहल्ल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत 6 लोकांचा मृत्यू झाला असून 9 महिन्यांच्या मुलासह अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोरही मारला गेला. महिला पोलिसाने हल्लेखोराचा खात्मा केल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली. वेस्टफिल्ड बोंडी जंक्शन शॉपिंग मॉलमध्ये ही घटना घडली.

Advertisement

हल्ल्याची माहिती मिळताच मॉलमध्ये पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकात एका महिला अधिकाऱ्याचा समावेश होता. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हल्लेखोराला पाहताच त्याच्या दिशेने बोट दाखवले. यानंतर महिला अधिकाऱ्याने शांतपणे हल्लेखोराचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, हल्लेखोराने मागे वळून महिला पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने चाकू दाखवला. महिला अधिकाऱ्याने लगेच गोळीबार केला, त्यात हल्लेखोर ठार झाला. महिला पोलिस अधिकाऱ्याने हल्लेखोरावर 2 ते 3 गोळ्या झाडल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

चाकूधारी हल्लेखोर स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.10 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता) मॉलमध्ये घुसला. काही वेळ खरेदीचा बहाणा केल्यानंतर त्याने लोकांवर हल्ला केल्याचे सहाय्यक आयुक्त अँथनी कुक यांनी सांगितले. हल्लेखोर एकटाच मॉलमध्ये घुसला. त्याच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. हल्लेखोराशी संबंधित कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही. हल्ल्याचे कारणही सध्या समजू शकलेले नाही. सिडनी पोलिसांचे विशेष पथक तपास करत असल्याचेही अँथनी कुक यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.