महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भीषण अपघातात सहा ठार मंग्यानकोपनजीक भरधाव कारची झाडाला धडक

11:06 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारची रस्त्याकडेच्या झाडाला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात वाहनातील सहाजण ठार झाले. कित्तूर-बिडी रस्त्यावर मंग्यानकोप गावाजवळ गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.   या अपघातात दोन पुरुष, एक महिला, दोन मुली व एका मुलाचा मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील मायलेकी तर दुसऱ्या एका कुटुंबातील बापलेकाचा ठार झालेल्यामध्ये समावेश आहे. मृतांमध्ये चालक शाहरुख सादिक पेंडारी (24) रा. शहापूर इचलकरंजी, इक्बाल लालखान जमादार (45) रा. हारुगेरी, परहार इक्बाल जमादार (13) रा. हारुगेरी, शबाना अस्लम लंगोटी (37), सानिया अस्लम लंगोटी (18), उमरा अस्लम लंगोटी (13) राहणार पेंढार गल्ली धारवाड यांचा समावेश आहे. तसेच माहीम वसीम लंगोटी, फरहान अकबरसाब बेटगेरी, सानिया इक्बाल जमादार, सुफिया वसीम जमादार हे चौघेजण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, कारमधील सर्वजण आपल्या नातेवाईकांपैकी बुधवारी कित्तूर येथे मुलीच्या घरी लग्नाला गेले होते. गुरुवारी गोल्याळी (ता. खानापूर) येथे वालिमाचे (रिसेप्शन) आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

त्याकरिता कित्तूरहून स्विफ्ट कार एमएच 12 ईएक्स 3052 या वाहनातून बिडी मार्गे गोल्याळी येथे जात होते. मंग्यानकोप गावाजवळ येतात भरधाव कारची झाडाला ठोकर बसल्याने वाहनातील चार जण जागीच ठार झाले. तर अन्य दोघांचा हॉस्पिटलला नेईपर्यंत मृत्यू झाला. तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर मृतांपैकी पाच जणांचे मृतदेह खानापूर येथील दवाखान्यात तर एकाचा मृतदेह बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला होता. या अपघातात भरधाव कारने झाडाला ठोकरल्याने वाहनाचे भाग जिकडे तिकडे तुटून विखुरले होते तर मृत वाहनामध्ये अडकून पडले होते. मंग्यानकोप व परिसरातील नागरिकांना वाहनातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तास लागले. वाहनातील मृतांची झालेली अवस्था पाहून प्रत्येकाचे मन हेलावून जात होते. पोलिसांसह सर्वजण यावेळी मदतीसाठी धावत होते. या घटनेची नोंद नंदगड पोलिसांत झाली आहे. अपघाताची माहिती मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना समजताच खानापूर शासकीय दवाखाना परिसरात एकच गर्दी झाली होती. सर्वत्र नातेवाईकांचा आक्रोश व व हळहळ होताना दिसत होती. मृतांपैकी जमादार व लंगोटी कुटुंबीय एकमेकांचे सगेसोयरे होते. शबाना, सानिया व उमरा या एकाच कुटुंबातील होत्या. सानिया ही बारावीच्या वर्गात तर उमरा दहावीच्या वर्गात धारवाड येथील अंजुमन कॉलेजमध्ये शिकत होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article