राज्यात वेगवेगळ्या अपघातात सहा ठार
बेंगळूर : राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने जाणारी कार भद्रा कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चन्नगिरी तालुक्यातील होसूर गावात घडली. मल्लिकार्जुन (वय 29) आणि सिद्धेश (वय 38) अशी मृतांची नावे आहेत.या घटनेची नोंद संतेबेन्नूर पोलिसांत झाली आहेत. दोन कार समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा बळी गेला. तर कारचालक गंभीर जखमी झाला आहे. चिक्कमंगळूर शहरातील हिरेगौज येथे ही घटना घडली. कुमारप्पा (वय 60) आणि सतीश (वय 35, दोघेही रा. चन्नगिरी) अशी मृतांची नावे आहेत. याची माहिती मिळताच सखरायपट्टण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वेगाने जाणारी दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मागडी तालुक्यातील कुदूरी येथे घडली. प्रसाद (वय 21) आणि मयूर (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर कुदूरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.