भारताचे सहा मुष्टियोद्धे अंतिम फेरीत
06:16 AM Jun 23, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ माही (सेशेल्स)
Advertisement
येथे सुरु असलेल्या सेशेल्स नॅशनल डे आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या 6 स्पर्धकांनी आपल्या वजन गटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
Advertisement
65 किलो गटात उत्तरप्रदेशचा आदित्य प्रताप, 50 किलो गटात हरियाणाचा हिमांशू शर्मा, 55 किलो गटात उत्तरप्रदेशचा एम. आशिष, 60 किलो गटात हरियाणाचा अनमोल, 70 किलो गटात कार्तिक दलाल, 90 किलोवरील गटात गौरव चौहान यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवून आपले किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. 50 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत हिमांशू शर्माने मॉरिशसच्या मॅथ्यू सोप्रेनचा 4-1 अशा गुणफरकाने पराभव केला. उत्तरप्रदेशच्या एम. आशिषने मॉरिशसच्या फ्रान्सीसवर 4-1 अशी मात केली.
Advertisement
Next Article