श्वासाविना सहा दिवस
जिवंत राहण्यासाठी आपल्याला क्षणोक्षणी श्वास घ्यावा लागतो हे सत्य आहे. काही काळासाठी जरी तो थांबला तरी जीवनयात्रा थांबू शकते. पाण्याशिवाय माणूस तीन दिवस कार्यरत राहू शकतो तर अन्नाशिवाय तो 10 दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकतो, असे आरोग्यशास्त्र सांगते. तथापि, आपल्या भोवती असे काही सजीव असतात की ज्यांना या जीवनासाठी अत्यावश्यक आणि अनिवार्य असणाऱ्या वायू. जल आणि अन्न या तीन बाबींशिवाय प्रदीर्घ काळपर्यंत जगता येते.
ज्याला बहुतेक माणसे घाबरतात, असा विंचू हा कीटक श्वास घेतल्याशिवाय तब्बल सहा दिवस जगू शकतो. त्याच्या फुप्फुसांची रचना अशी असते, की एकदा श्वास आत ओढून घेतल्यानंतर तो प्रदीर्घ काळ श्वास रोखून धरु शकतो. अशा फुप्प्फुसांना ‘बुक लंग्ज’ अशी संज्ञा आहे. विंचवाच्या फुप्फुसांचा आकार पुस्तकांच्या दुमडलेल्या पानांसारखा असतो. त्यामुळे ही संज्ञा दिलेली आहे. अशा आकारामुळे विंचवाच्या फुप्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात हवा कोंडली जाते. काही जातीच्या विंचवांना त्यामुळे सहा दिवसांपर्यंत विनाश्वास जगता येते. केवळ श्वासच नव्हे, तर विंचवाला पाणी आणि अन्नही कमी लागते. विंचू एक वर्षाहून अधिक काळ अन्नाशिवाय जगू शकतो. ते मिळो नाही, तरी त्याच्या हालचाली होत राहतात.
पाण्याशिवाय विंचू बराच जगू शकत असला तरी आणि त्याला थोड्याच पाण्याची आवश्यकता असली तरी. हवा आणि अन्न यापेक्षा त्याला पाणी अधिक लागते. त्यामुळे तो थोडे थोडे पाणी शोषत राहतो, असे प्राणी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विचवांच्या या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जात आहे. वेशेषत: त्याच्या फुप्फुसांच्या रचनेवर बरेच संशोधन केले जात आहे.