शिवकार्तिकेयनला मिळाला नवा चित्रपट
शिवकार्तिकेयनने ‘अमरन’ चित्रपटाद्वारे देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता शिवकार्तिकेयन हा जयम रवि यांच्यासोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. दिग्दर्शक सुधा कोंगारा यांच्यासोबत तो ‘एसके25’मध्ये काम करणार आहे.
हा चित्रपट व्यापक स्तरावर प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचा प्रोमो यापूर्वीच चित्रित करण्यात आला आहे. हा एक पीरियड ड्रामा असेल आणि त्याची निर्मिती बिगबजेटच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती शिवकार्तिकेयनने दिली आहे.
या चित्रपटात जयम रवि हे खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. दिग्दर्शक सुधा कोंगरा यांनी ‘सोरारई पोटरु’ चित्रपटाद्वारे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तर शिवकार्तिकेयनचा अलिकडेच प्रदर्शित चित्रपट ‘अमरन’ला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. या चित्रपटाने 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. एसके 25 या चित्रपटात शिवकार्तिकेयन हा अथर्व नावाची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे जयम रवि हे अलिकडेच वैयक्तिक आयुष्यावरून चर्चेत राहिले आहेत. मागील वर्षी त्यांनी पत्नी आरतीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती.