For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोगोईंच्या पत्नीप्रकरणी एसआयटी चौकशी

06:45 AM Feb 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोगोईंच्या पत्नीप्रकरणी एसआयटी चौकशी
Advertisement

पाकिस्तान-आयएसआय कनेक्शनचा आरोप : आसाम मुख्यमंत्र्यांची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी काँग्रेस नेते गौरव गोगोई आणि त्यांच्या ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांच्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोलबर्न यांच्या कथित पाकिस्तानी कनेक्शनची आता एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. या मुद्द्यावर राज्य मंत्रिमंडळात चर्चा होईल आणि यानंतर तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. गौरव गोगोई यांच्या पत्नीने भारताचे नागरिकत्व स्वीकारले आहे की नाही हे स्पष्ट करावे तसेच पत्नीच्या आयएसआय कनेक्शनच्या आरोपावर गोगोई यांनी स्पष्टीकरण द्यावे असे शर्मा यांनी म्हटले.

Advertisement

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप, युवांना पाकिस्तानच्या दूतावासात नेत त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न, मागील 12 वर्षांपासून भारतीय नागरिकत्व न स्वीकारण्याचे प्रकरण गंभीर आहे. याप्रकरणी गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नीने स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचा दावा मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांनी केला आहे.

सत्य समोर आणणार

धर्मांतराच्या टोळीत सामील होणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला कमकुवत करण्यासाठी जॉर्ज सोरोस यासारख्या बाहेरील स्रोतांकडून निधी प्राप्त करणे देखील चिंताजनक आहे. अशा प्रकरणांमध्ये उत्तरदायित्व टाळणे सोपे नाही. तसेच जबाबदारी टाळून किंवा इतरांवर आरोप करून लक्ष विचलित करणे यावर उपाय नाही. देशाला सत्य अन् पारदर्शकतेची आवश्यकता असल्याचे उद्गार शर्मा यांनी काढले आहेत.

पाकिस्तानी राजदूताची भेट

पाकिस्तानच्या अली शेखने भारतविरोधी प्रचार केला होता. तो एलिझाबेथ कोलबर्न यांचा सहकारी आहे. अली शेखने यापूर्वी देखील भारताच्या विरोधात अशाप्रकारच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट केल्या आहेत.  गौरव गोगोई यांनी स्वत:च्या पत्नीचे नागरिकत्व आणि त्यांच्या पाकिस्तानातील प्रोफेशनल वर्कवर स्पष्टीकरण द्यावे. याचबरोबर विदेश मंत्रालयाला न कळविता पाकिस्तानी राजदूताची भेट का घेतली हे देखील त्यांनी सांगावे असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

आयएसआयचा हात

गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांच्या पाकिस्तान सोबतच्या संबंधांप्रकरणी गुन्हा नोंदविला जाऊ शकतो तसेच त्याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन केले जाणार आहे.  तपास पुढे नेण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा तपशीलाची पुष्टी करण्यात येणार आहे. देशविरोधी घटकांबद्दल सहानुभूमी बाळगणाऱ्या सर्व लोकांची विस्तृत चौकशी केली जाणार आहे. गौरव गोगोई यांचे पिता तरुण गोगोई हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आयसएसआयने त्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता, असा संशयही व्यक्त होत असल्याचे हेमंत शर्मा यांनी म्हटले आहे.

गौरव गोगोई यांचे स्पष्टीकरण

भाजप मला आणि माझ्या परिवाराला बदनाम करण्याकरता खूपच पुढे निघून गेला आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे दुष्ट भावनेने प्रेरित अन् निराधार आहेत. याप्रकरणी मी योग्य कायदेशीर कारवाई करणार असल्याचे गौरव गोगोई यांनी म्हटले आहे.

अली शेखच्या पोस्टवरून वाद

हेमंत विश्व शर्मा यांनी पाकिस्तानच्या अली शेखच्या एका एक्स पोस्टवर स्वत:ची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अली शेखने या पोस्टमध्ये गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ यांनाही टॅग केले होते. या पोस्टमध्ये अली शेखने गौरव गोगोई यांच्याकडून संसदेत दिल्ली दंगलीवर चर्चा करणे आणि मग लोकसभा अध्यक्षांकडून त्यांना निलंबित करण्यात आल्याचा उल्लेख होता.

Advertisement
Tags :

.