कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भावोजीकडून मेहुणीचा चाकूने वार करून खून

01:10 PM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोकाक तालुक्यातील खणगावमधील घटना : संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Advertisement

बेळगाव : भावोजीने चाकूने वार करून मेहुणीचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री गोकाक तालुक्यातील खणगाव येथे घडली आहे. या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. खुनाच्या या घटनेने खणगाव परिसरात खळबळ माजली आहे. सुजाता मंजुनाथ चत्रकोटी (वय 24) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या मोठ्या बहिणीचा पती बंगारप्पा यल्लाप्पा इरयन्नावर (वय 23) याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. घटनेची माहिती समजताच गोकाक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपी बंगारप्पा हा खून झालेल्या सुजाताची मोठी बहीण रुक्मव्वाचा पती आहे.

Advertisement

सुजाताचे सासर यरगट्टी तालुक्यातील माडमगेरी येथे आहे. तर बंगारप्पा हा येळपट्टी गावचा. उदरनिर्वाहानिमित्त रुक्मव्वा व सुजाताचे कुटुंबीय खणगावमध्ये रहात होते. दोघांचीही आजूबाजूला घरे आहेत. शनिवार दि. 12 एप्रिल रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास नशेत घरी आलेल्या बंगारप्पाने आपल्या मेहुणीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मेहुणीने दार उघडताच तिच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेतील सुजाताला रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेसंबंधी माहिती देताना सुजाताची आई मल्लव्वा हिने सांगितले, की आपला जावई बंगारप्पा याने चाकूने वार करून सुजाताचा खून केला आहे. तिला तीन अपत्ये आहेत. नशेत त्याने आपल्या लहान मुलीचा बळी घेतल्याचे या महिलेने सांगितले. गोकाक ग्रामीण पोलिसांनी बंगारप्पाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article