For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिसोदियांच्या कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

06:41 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिसोदियांच्या कोठडीत 15 मे पर्यंत वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याच्या सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 मेपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणातील सुनावणीतील पुढील युक्तिवादासाठी न्यायालयाने 15 मे ही तारीख निश्चित केली आहे. यापूर्वी 2 मे रोजी मनीष सिसोदिया यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) द्वारे तपासल्या जात असलेल्या उत्पादन धोरण प्रकरणात जामीन नाकारण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आपचे नेते कोठडीत आहेत. 30 एप्रिल रोजी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने या प्रकरणात दुसऱ्यांदा सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मद्य धोरण प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असल्यामुळे अर्जदाराला नियमित किंवा अंतरिम जामीन देण्यास हे न्यायालय इच्छुक नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले होते. त्याचवेळी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.