For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी 695 उमेदवार

06:56 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी 695 उमेदवार
Advertisement

प्रचार थांबला : उद्या मतदान : राहुल गांधी, स्मृती इराणींची प्रतिष्ठा पणाला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेचे आतापर्यंत चार टप्पे पूर्ण झाले आहेत. पाचव्या फेरीचा निवडणूक प्रचार शनिवारी संपला आहे. या टप्प्यासाठी सोमवार, 20 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. या राज्यांमधून 695 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Advertisement

पाचव्या टप्प्यासाठी 49 लोकसभा मतदारसंघात लढणाऱ्या उमेदवारांची सरासरी संख्या 14 आहे. या टप्प्यातही दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले असून त्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

पाचव्या टप्प्यामध्ये बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, महाराष्ट्रातील 13, ओडिशातील पाच, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7 जागांसह जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येकी एका जागेवर सोमवारी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून निवडणूक प्रचाराशी संबंधित सर्व क्रियाकलाप आणि प्रचाराला पूर्णविराम मिळाला. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सदर मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या बाहेरील कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जाहीर प्रचारानंतर आता छुप्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना रविवारचा एक दिवस मिळणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी मोबाईल फोन, स्मार्ट फोन, वायरलेस सेट इत्यादी मतदान केंद्रांच्या आत नेण्यास बंदी घातली आहे.

राहुल गांधी, स्मृती इराणी, राजनाथ सिंह रिंगणात

पाचवा टप्पा देशासाठी महत्त्वाचा असून त्यात काँग्रेसच्या रायबरेली आणि अमेठीच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून तर स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. तसेच लखनौमध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रिंगणात आहेत. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज, गोंडा या जागांवर मतदान होणार आहे.

Advertisement
Tags :

.