For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिसोदिया जामिनासाठी आता कनिष्ठ न्यायालयात

06:09 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिसोदिया जामिनासाठी आता कनिष्ठ न्यायालयात
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी  दिल्ली

Advertisement

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया हे दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी गेल्यावषी 26 फेब्रुवारीपासून तुऊंगात आहेत. त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अर्ज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता आपचे नेते पुन्हा आपली याचिका घेऊन ‘राऊस एव्हेन्यू’ या कनिष्ठ न्यायालयात पोहोचले आहेत. या प्रकरणाची सुनावणी 18 मार्च म्हणजेच सोमवारी होणार आहे.

मनीष सिसोदिया यांनी आपल्या जामीन याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी करत राऊस एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली आहे. सिसोदिया यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात क्मयुरेटिव्ह जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. त्याच्या नियमित जामीन अर्जावर 19 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. आता सिसोदिया आपली दुसरी नियमित जामीन याचिका दाखल करून तुरुंगाबाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.