हैदराबादमध्ये सिराजचे नवे हॉटेल
वृत्तसंस्था / हैदराबाद
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आता हॉटेल क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचे ठरविले आहे. हैदराबाद शहरामध्ये सिराजच्या मालकीचे एक अद्ययावत हॉटेल लवकरच सुरू होणार आहे.
सिराजचे हे नवे हॉटेल हैदराबाद शहरातील जोहारफा या मध्यवर्ती ठिकाणी सुरू होणार आहे. या हॉटेलमध्ये अरेबियन, पर्शियन, चायनिज आणि मुघलाई मसालेदार डिशीस खवय्यांना उपलब्ध करुन देण्यात येतील. या नव्या रेस्टॉरंटमध्ये अनुभवी कर्मचारीवर्गाची नियुक्ती केली जाणार असून सर्व खाद्यपदार्थ ताजे, दर्जेदार आणि चवदार राहतील, अशी ग्वाही सिराजने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. यापूर्वी क्रिकेट क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, सौरभव गांगुली यांनीही हॉटेल व्यवसायिक क्षेत्रात प्रवेश केला होता. तसेच दिल्लीमध्ये विराट कोहलीच्या मालकीचेही हॉटेल आहे. आता हॉटेल व्यवसायिक क्षेत्रात प्रवेश करणारा मोहम्मद सिराज हा चौथा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे.