कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संसदेत ‘एसआयआर’वर चर्चा होणार

06:19 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

9  डिसेंबरला दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

निवडणूक सुधारणा आणि ‘एसआयआर’ या महत्वाच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही चर्चा पुढच्या मंगळवारी, अर्थात, 9 डिसेंबरला केली जाणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ही चर्चा होईल, असे सांसदीय कार्य विभागाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.

एसआयआरवर चर्चा करण्याचा आग्रह विरोधी पक्षांनी धरला आहे. यासाठी त्यांनी दोन दिवस संसदेच्या कामात व्यत्यय आणला आहे. शीतकालीन अधिवेशनाचे पहिले दोन्ही दिवस विरोधकांच्या गदारोळामुळे वाया गेले आहेत. आता सरकारने या विषयावर चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याने संसदेचे यापुढचे काम व्यवस्थित चालण्याची शक्यता आहे. निवडणूक सुधारणा असा चर्चेचा विषय असला, तरी विरोधकांकडून एसआयआरवरच अधिक भर दिला जाईल, अशी शक्यता आहे. मतदारसूची स्वच्छ करण्यासाठी एसआयआर आवश्यक आहे, असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रलंबित आहे. कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास आम्ही सज्ज आहोत. विरोधकांनी शांतता राखून कामकाज होण्यात साहाय्य करावे, असे सरकारचे आवाहन आहे.

चर्चा वादळी होणार

निवडणूक सुधारणेच्या मुद्द्यावरची संसदेतील चर्चा वादळी होण्याची शक्यता आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सत्तधाऱ्यांकडून मतदारसूचीत घोटाळा केला जात आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा  महत्वाचा करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून, विशेषत: काँग्रेसकडून करण्यात आला होता. तथापि, मतदारांनी या मुद्द्याकडे मुळीच लक्ष न दिल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारचे नैतिक बळ वाढले आहे. पराभवामुळे आलेले नैराश्य लपविण्यासाठी विरोधकांनी हा निरर्थक मुद्दा लावून धरला आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा आणि विरोधकांच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सत्ताधारी आघाडीच्या अनेक नेत्यांनी केली आहे.

‘वंदे मातरम्’वरही चर्चा होणार

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा महामंत्र ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाच्या निर्मितीला यावर्षी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे संसदेत या गीतावर विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चा 10 डिसेंबरला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेत सहभागी होणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article