For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिनर, स्वायटेक, गॉफ, ओसाका चौथ्या फेरीत

06:55 AM Sep 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिनर  स्वायटेक  गॉफ  ओसाका चौथ्या फेरीत
Advertisement

व्हेरेव्ह , फ्रेच, शेपोव्हॅलोव्ह , कॅसेटकिना पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या शेवटच्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत इटलीचा विद्यमान विजेता जेनिक सिनर, पोलंडची इगा स्वायटेक, अमेरिकेची गॉफ आणि जपानच्या ओसाका यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. दरम्यान कॅनडाचा डेनिस शेपोव्हॅलोव्ह , जर्मनीचा व्हेरेव्ह , पोलंडची फ्रेच आणि कॅसेटकिना यांचे आव्हान संपुष्टात आले. व्हिनस विलीयम्स आणि लैला फर्नांडिस यांनी महिला दुहेरीची तिसरी फेरी गाठली.

Advertisement

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या विद्यमान विजेत्या जेनिक सीनरने कॅनडाच्या 27 व्या मानांकित डेनीस शेपोव्हॅलोव्हचा 5-7, 6-4, 6-3, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. हार्डकोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धेत सिनेरने अलिकडच्या कालावधीत सलग 24 सामने जिंकले आहेत. त्याने 2023 पासून हार्डकोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकही सामना गमवलेला नाही. तसेच त्याने या कालावधीत दोनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे.

तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात फेलिक्स ऑगेर अॅलिसिमेने जर्मनीच्या तृतीय मानांकित व्हेरेव्हला 4-6, 7-6 (7-5), 6-4, 6-4 असा पराभवाचा धक्का देत चौथी फेरी गाठली आहे.  2021 नंतर अॅलिसिमेने पहिल्यांदाच चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली आहे. अॅलिसिमेचा पुढील फेरीतील सामना रशियाच्या रूबलेव्हशी होणार आहे. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात बुबलीकने टॉमी पॉलचा 7-6 (7-5), 6-7 (4-7), 6-3, 6-7 (5-7), 6-1 अशा 5 सेट्समधील लढतीत पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. अॅलेक्स डी मिनॉरने अल्टमेअरचा 6-7 (7-9), 6-3, 6-4, 2-0 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. चौथा सेट्स सुरू असताना दुखापतीमुळे अल्टमेअरने माघार घेतल्याने मिनॉरला पुढे चाल मिळाली. अमेरिकेच्या टेलर फ्रित्झने किमचा 7-6 (7-3), 6-7 (9-11), 6-4, 6-4 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. मुसेटीला तिसऱ्या फेरीत कोबोलीकडून पुढे चाल मिळाली. मुसेटीने हा सामना 6-3, 6-2, 2-0 अशा फरकाने जिंकला. दुखापतीमुळे कोबोलीने माघार घेतली.

महिलांच्या विभागात पोलंडच्या इगा स्वायटेकने अॅना कॅलिनस्कॉयचा 7-6 (7-2), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत चौथ्या फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित स्वायटेकने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून, आता तिचा चौथ्या फेरीतील सामना इकटेरेना अॅलेक्सेंड्रोव्हाशी होणार आहे. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफने पोलंडच्या फ्रेचचा 6-3, 6-1 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. तिचा चौथ्या फेरीतील सामना जपानच्या नाओमी ओसाकाशी होणार आहे. जपानच्या ओसाकाने तिसऱ्या फेरीतील सामन्यात 15 व्या मानांकित डेरिया कॅसेटकिनाचा 6-0, 4-6, 6-3 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात अॅनिसीमोव्हाने क्रिस्टेनचा 6-4, 4-6, 6-2 तसेच हेदाद माईयाने सॅकेरिचा 6-1, 6-2, अॅलेक्सेंड्रोव्हाने सिगमंडचा 6-0, 6-1 असा फडशा पाडत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या दुहेरीमध्ये अमेरिकेची व्हिनस विलियम्स आणि कॅनडाच्या लैला फर्नांडिसने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना इकेरी व होजुमी यांचा 7-6 (7-1), 6-1 असा पराभव केला. 45 वर्षीय व्हिनसला या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्डद्वारे  प्रवेश देण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.