महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एअर इंडिया-विस्तारा विलीनीकरणास सिंगापूरकडूनही हिरवा कंदील

06:14 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोव्हेंबर-2022 मध्ये दोघांची करारावर स्वाक्षरी

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

सिंगापूरच्या स्पर्धा आणि ग्राहक आयोगाने (सीसीसीएस) एअर इंडिया आणि विस्ताराच्या प्रस्तावित विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. दोन एअरलाइन्समधील विलीनीकरण कराराच्या घोषणेनंतर 15 महिन्यांनंतर सीसीसीएसने ही मान्यता दिली आहे. कंपन्यांनी नोव्हेंबर-2022 मध्ये विलीनीकरणाचा करार केला होता. त्याच वेळी, या विलीनीकरणाला भारतीय नियामक सीसीआयने सप्टेंबर-2023 मध्ये मान्यता दिली आहे.

या विलीनीकरणानंतर एअर इंडिया आता देशातील दुसरी सर्वात मोठी देशांतर्गत आणि सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा कंपनी बनली आहे. सिंगापूर कॉम्पिटिशनने सांगितले की त्यांनी टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया आणि टाटा-सिंगापूर एअरलाइन्सची संयुक्त कंपनी विस्तारा यांच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. मात्र, असे करताना काही अटीही लादल्या गेल्या असल्याचे समजते.

नवीन फर्ममध्ये एअर इंडियाचा 74.9टक्के हिस्सा

हिस्सेदारीचा विचार केला गेल्यास सदरच्या विस्तारामध्ये टाटा सन्सचा 51 टक्के आणि सिंगापूर एअरलाइन्सचा 49 टक्के हिस्सा आहे. करारानुसार, टाटा 74.9 टक्के आणि सिंगापूर एअरलाइन्स (एसआयए) ची नवीन फर्ममध्ये 25.1 टक्के हिस्सेदारी असेल. नवीन फर्मचे नाव एआर-विस्तारा-एआय एक्सप्रेस-एअर एशिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड राहणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article