सिनेर, लिहेका, साबालेंका तिसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ बिजिंग
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या चायना खुल्या पुरूष आणि महिलांच्या 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत इटलीचा टॉपसिडेड सिनेर तसेच लिहेका यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिलांच्या विभागात अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेती साबालेंकाने तिसरी फेरी गाठली आहे.
पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात सिनेरने रोमन सैफुलीनचा 3-6, 6-2, 6-3 तसेच लिहेकाने स्पेनच्या रॉबर्ट अॅग्युटचा 3-6, 6-2, 6-1, इटलीच्या केबोलीने कोटोव्हचा 6-4, 6-2 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
महिलांच्या विभागात साबालेंकाने एकेरीची तिसरी फेरी गाठताना थायलंडच्या सेवांगकेयूचा 6-4, 6-1, अमेरिकेच्या व्रुगेरने न्यूझीलंडच्या सनचा 6-1, 7-6 (7-4), इटलीच्या जस्मीन पाओलिनीने डेन्मार्कच्या टॉसनचा 1-6, 7-5, 6-4, पोलंडच्या लिनेटीने युचीजिमाचा 6-4, 4-6, 6-3, रशियाच्या कॅसेटकिनाने क्रोएशियाच्या फेटचा 6-1, 6-2, अॅनीसिमोव्हाने कोलंबियाच्या ओसोरिओचा 1-6, 6-3, 6-4, रोमानियाच्या क्रिस्टेनने क्रेसीकोव्हाचा 1-6, 6-4, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
मॅकहेक उपांत्यपूर्व फेरीत
टोकियोत सुरू असलेल्या एटीपी टूरवरील जपान खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत टॉमस मॅकहेकने पाचव्या मानांकीत टॉमी पॉलचा 2-6, 6-3, 7-6 (7-4) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेत टॉपसिडेड फ्रिझ, कास्पर रूड आणि सित्सिपेस यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. द्वितीय मानांकीत हुरकेझला दुसऱ्या फेरीत ड्रेपरने 6-4, 6-4 असे पराभूत केले. डेन्मार्कच्या रूनेने जपानच्या निशीओकाचा 6-2, 6-4, अमेरिकेच्या मिचेलसनने ऑस्ट्रेलियाच्या ओकोनिलचा 6-1, 6-4, निशीकोरीने थॉमसनचा 6-2, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.