महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिनेर, गॉफ, स्वायटेक यांची विजयी सलामी

06:58 AM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : सित्सिपेस, सोफिया केनिन, सिनीयाकोव्हा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था / मेलबर्न

Advertisement

2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात इटलीचा टॉप सिडेड जेनिक सिनेर तसेच महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफ यांनी विजयी सलामी देत आपल्या मोहिमेला प्रारंभ केला. मात्र सोफिया केनिन आणि स्टिफॅनोस सित्सिपस यांचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

पुरुष एकेरीच्या सलामीच्या सामन्यात इटलीच्या टॉप सिडेड आणि विद्यमान विजेत्या जेनिक सिनेरने विजयाने आपल्या मोहिमेला प्रारंभ केला. पहिल्या फेरीतील सामन्यात सिनेरने निकोलास जेरीचा 7-6 (7-2), 7-6 (7-5), 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. सदर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टेनिस शौकिनांचे लक्ष सिनेरच्या डोपिंग प्रकरणाकडे लागले होते. चिलीच्या 29 वर्षीय जेरीने सिनेरला पहिल्या दोन सेटस्मध्ये चांगलेच झुंझवित हे सेटस् टायब्रेकरपर्यंत लांबविले. गेल्या वर्षी या स्पर्धेत अंतिम सामन्यात सिनेरने मेदव्हेदेव्हचा पराभव करुन आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत पहिले ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविले होते. सिनेर यावेळी हे जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्न करेल. गेल्या वर्षीच्या या स्पर्धेमध्ये सिनेरने उपांत्य सामन्यात सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचला पराभवचा धक्का दिला होता.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या 20 वर्षीय अॅलेक्स मिचेलसेनने ग्रिसच्या स्टिफॅनोस सित्सिपेसला पराभूत करुन अनपेक्षित धक्का दिला. मिचेलसेनचा हा युवा टेनिस कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल. 2023 साली सित्सिपेसने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.पहिल्या फेरीतील सामन्यात मिचेलसनने सित्सिपेसचा 7-5, 6-3, 2-6, 6-4 अशा सेटमध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत मानांकनातील पहिल्या 20 टेनिसपटूमध्ये पहिल्याच फेरीत पराभव पत्करणारा 11 वा मानांकित सित्सिपेस हा पहिला टेनिसपटू आहे. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात टिफोईने फ्रान्सच्या रिंडरकेनीचचा पराभव केला.

महिला एकेरीच्या विभागात सोमवारी अमेरिकेच्या तृतिय मानांकित कोको गॉफने सोफिया किनीनचा पराभव करत विजयीसलामी दिली. 2020 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या किनीनला मात्र यावेळी पहिली फेरी पार करता आली नाही. गेल्या नोव्हेंबरमध्ये डब्ल्युटीए फायनल्स स्पर्धा जिंकणाऱ्या तृतिय मानांकित गॉफने किनीनचा 6-3, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडला. गेल्या आठवड्यात गॉफच्या शानदार कामगिरीमुळे अमेरिकन संघाने युनायटेड चषक पटकाविला होता. अलिकडच्या कालावधीत गॉफने यापूर्वी सलग 33 सामने जिंकले असून तिने यापुढेही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या सामन्यात गॉफने 12 बिनतोड सर्व्हिस आणि 9 दुहेरी चुका केल्या. तसेच तिने 8 पैकी 7 ब्रेक पॉईंट्स वाचविले. किनीनला गेल्या चार ग्रॅन्डस्लॅम स्पर्धामध्ये पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. आता गॉफचा पुढील सामना ब्रिटनच्या जॉडी ब्युरेजशी होणार आहे. या स्पर्धेत 12 वी मानांकित डायना स्नेडर, 23 वी मानांकित मॅगडेलीना फ्रेच आणि 25 वी मानांकित सॅमसोनोव्हा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित दुसरी फेरी गाठली. रविवारी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुमारे 6 तास पाऊस झाल्याने अनेक सामने पुढे ढकलावे लागले. पोलंडच्या इगा स्वायटेकने कॅटरिना सिनीयाकोव्हाचा 6-3, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत विजयी सलामी दिली.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article