सिंधू विजयी, आयुश शेट्टीचा पराभव
वृत्तसंस्था/ शेनझेन, चीन
भारताची स्टार बॅडमिंनटपटू पीव्ही सिंधूने येथे सुरू झालैलया चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात करून उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. तिने डेन्मार्कच्या ज्युली दवाल जेकब्सनवर विजय मिळविला.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या सिंधूने केवळ 27 मिनिटांत जेकब्सनचा 21-4, 21-10 असा धुव्वा उडविला. दहा दिवसापूर्वी सिंधूला हाँगकाँग ओपन सुपर 500 स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी आणखी डॅनिश खेळाडू ख्रिस्तोफर्सनने तिला हरविले होते. या वर्षात सहा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवरील स्पर्धेत सिंधूला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागलेला आहे. पण ही मालिका खंडित करीत तिने येथे शानदार प्रदर्शन करीत पहिला गेम केवळ 10 मिनिटांत घेतला. दुसऱ्या गेममध्येही तिने वर्चस्व कायम राखत गेमसह सामना जिंकला. याआधीही सिंधूने जेकब्सनवर दोन लढतीत विजय मिळविलेला आहे.
युवा खेळाडू आयुश शेट्टीने जोरदार संघर्ष केला, पण त्याला पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. सहाव्या मानांकित व जागतिक पाचव्या मानांकित चिनी तैपेईच्या चौ तिएन चेनने 21-19, 12-21, 16-21 असे हरविले. 68 मिनिटे ही झुंज रंगली होती. चेनने या वर्षात तिसऱ्यांदा आयुशवर विजय मिळविला आहे. आयुश पराभूत झाला असला तरी बीडब्ल्यूएफच्या ताज्या मानांकनात 27 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे आजवरचे हे सर्वोत्तम मानांकन आहे. हाँगकाँग ओपनमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती आणि जागतिक नववा मानांकित जपानच्या कोदाय नाराओकाला धक्का दिला होता. मिश्र दुहेरीमध्ये रुत्विका ग•s व रोहन कपूर यांनाही पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या युइची शिमोगामी व सायाका होबारा यांनी 21-17, 21-11 असे हरविले.