For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधू, सात्विक-चिराग, तनिशा-ध्रुव यांची विजयी सलामी

06:43 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिंधू  सात्विक चिराग  तनिशा ध्रुव यांची विजयी सलामी
Advertisement

किरण जॉर्ज दुसऱ्या फेरीत, त्रीसा-गायत्री पहिल्याच फेरीत पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पीव्ही सिंधू, सात्विकसाईराज-चिराग शेट्टी, तनिशा क्रॅस्टो-ध्रुव कपिला यांनी विजय मिळवित दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

Advertisement

मलेशिया ओपन सुपर 1000 या मोसमातील पहिल्या स्पर्धेत सिंधू खेळू शकली नव्हती. येथील सामन्यात तिला लय सापडण्यास थोडा वेळ लागला. पण नंतर जागतिक 24 व्या मानांकित चिनी तैपेईच्या सुंग शुओ युन हिचा 21-14, 22-20 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. मोठ्या ब्रेकनंतर लय सापडणे अवघड जाते, अशी सिंधू म्हणाली. तिची पुढील लढत जपानच्या मनामा सुइझुशी होईल.

पुरुष दुहेरीत सातव्या मानांकित सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्यांनी मलेशियाच्या जागतिक सातव्या मानांकित मॅन वेइ चाँग व काइ वुन टी यांच्यावर 23-21, 19-21, 21-16 अशी मात केली. पुरुष एकेरीत किरण जॉर्जने तीन गेम्सची रोमांचक लढत जिंकताना तीन मॅचपॉईंट वाचवत जपानच्या जागतिक 25 व्या मानांकित युशी तनाकाचा 21-19, 14-21, 27-25 अशी मात केली.

तनिशा-ध्रुव दुसऱ्या फेरीत

मिश्र दुहेरीत तनिशा क्रॅस्टो व ध्रुव कपिला यांनी दुसरी फेरी गाठताना चिनी तैपेईच्या चेन चेंग कुआन व सू, यिन हुइ यांचा 8-21, 21-19, 21-17 असा पराभव केला. महिला दुहेरीत अश्विनी भट-शिखा गौतम यांनीही दुसरी फेरी गाठताना क्रिस्टल लाइ जॅकी डेंट यांना 22-20, 21-18 असे हरविले. पाचव्या मानांकित त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांचे आव्हान मात्र जपानच्या अरिसा इगाराशी व आयाको सकुरामोटो यांनी 23-21, 21-19 असे संपुष्टात आणले. याशिवाय अमृता प्रमुथेश व सोनाली सिंग यांनाही स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्यांना थायलंडच्या ओ. जाँगसाथपोर्नपार्न व एस. सुवाचाइ यांनी 21-19, 15-21, 12-21 असे हरविले. मिश्र दुहेरीत एस करुणाकरन-आद्या वरियत, रोहन कपूर-रुत्विका ग•s यांनाही पराभव स्वीकारावे लागले. किदाम्बी श्रीकांतला या स्पर्धेत शेवटच्या क्षणी प्रवेश देण्यात आला होता. पण पहिल्या फेरीतून त्याने माघार घेतल्याने त्याच्या चिनी प्रतिस्पर्ध्याला पुढे चाल देण्यात आली.

Advertisement
Tags :

.