कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधू पराभूत, लक्ष्य, अश्विनी-तनिशा यांची आगेकूच

06:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बर्मिंगहॅम : भारताचे लक्ष्य सेन व महिला दुहेरीची जोडी अश्विनी पोनप्पा व तनिशा क्रॅस्टो यांनी येथे सुरू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर अव्वल खेळाडू पीव्ही सिंधूने जोरदार संघर्ष केला पण द.कोरियाच्या अग्रमानांकित अॅन से यंगकडून पुन्हा एकदा पराभूत झाली. सिंधूने जोरदार संघर्ष करीत आपण चांगल्या टचमध्ये असल्याचे दाखवून दिले. मात्र तिला आपल्या चुकांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिला यंगकडून 19-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला. सिंधूचा यंगकडून झालेला हा सलग सातवा पराभव आहे. यंगने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकत स्पर्धा जिंकणारी पहिली द.कोरियन महिला होण्याचा मान मिळविला होता. या मोसमात यंगने मलेशिया व फ्रेंच ओपन स्पर्धेतही जेतेपद पटकावले आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीनंतर सिंधूने यावर्षी पुनरागमन केले आहे.

Advertisement

पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने डेन्मार्कच्या मॅग्सन जोहान्सेनला 21-14, 21-14, असा पराभवाचा धक्का दिला. महिला दुहेरीत तनिशा-अश्विनी यांनी हाँगकाँगच्या युंग एन्गा टिंग व युंग पुइ लाम यांच्यावर 21-13, 21-18 अशी मात करीत आगेकूच केली. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन हा एकमेव भारतीय उरला असून एचएस प्रणॉय व किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले आहे. ऑलिम्पिकसाठी उपलब्ध असलेल्या एकमेव स्थानासाठी महिला दुहेरीच्या जोड्या प्रयत्न करीत असून त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांना पहिल्याच फेरीत इंडोनेशियाच्या अप्रियानी राहयू व सिती फादिया यांच्याकडून 18-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला. त्रीसा-गायत्री यांचे 50,714 गुण असून ते अश्विनी-तनिशा यांच्यापेक्षा (49,810) मानांकन गुणांनी पुढे आहेत. मात्र ऑलिम्पिकचा विचार करताना अश्विनी-तनिशा (49,810) या त्रीशा-गायत्री (44,710) यांच्यापेक्षा 5096 गुणांनी पुढे आहेत. या महिन्यात स्विस ओपन व माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेतील कामगिरीनंतर या दोन भारतीय जोड्यांचे ऑलिम्पिक भवितव्य निश्चित होईल.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article