For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉकी फाईव्ह वर्ल्ड कपसाठी सिमरनजीत सिंग, रजनीकडे नेतृ त्व

06:42 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॉकी फाईव्ह वर्ल्ड कपसाठी सिमरनजीत सिंग  रजनीकडे नेतृ त्व
Advertisement

24 जोनवारीपासून मस्कतमध्ये सुरू होणार महिला व पुरुषांची स्पर्धा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सिमरनजीत सिंग व रजनी इतिमर्पू यांची पुरुष व महिला हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ओमानमधील मस्कत येथे होणार आहे.

Advertisement

महिलांची हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धा जानेवारी 24 ते 27 या कालावधीत तर पुरुषांची स्पर्धा 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. अनुभवी गोलरक्षक रजनीची कर्णधारपदी तर डिफेंडर महिमा चौधरीची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मनदीप मोर याची पुरुष संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला संघात बन्सरी सोळंकी ही दुसरी गोलरक्षक असून अक्षता आबासो ढेकळे व ज्योती छात्री बचावपटू आहेत. मध्यफळीत मारियाना कुजुर, मुमताज खान यांना तर अजमिना कुजुर, रुतुजा दादासो पिसाळ, दीपिका सोरेंग यांना आघाडी फळीत निवडण्यात आले आहे. महिला संघाचा क गटात समावेश असून याच गटात नामिबिया, पोलंड, अमेरिका यांचाही समावेश आहे.

महिला हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश असून फिजी, मलेशिया, नेदरलँड्स, यजमान ओमान यांचा अ गटात समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका, युक्रेन, झाम्बिया ब गटात, न्यूझीलंड, पराग्वे, थायलंड, उरुग्वे ड गटात आहेत. ‘पुरेसा आंतरराष्ट्रीय अनुभव व प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याच्या आव्हानाची समज या संघातील खेळाडूंना असून आपल्या संघाची चांगली तयारी झाली आहे. या स्पर्धेत खेळण्यास आपला संघ सज्ज झाला आहे,’ असे संघाच्या प्रशिक्षिका सौदर्या यांनी म्हटल्याचे हॉकी इंडियाने पत्रकात नमूद केले आहे.

ऑलिम्पिक कांस्यविजेता सिमरनजीत सिंग पुरुष संघाचा कर्णधार असून या संघात सुरज करकेरा, प्रशांत कुमार चौहान हे गोलरक्षक आहेत. मनदीप मोर, मनजीत बचावफळीत, मोहम्मद राहील मौसीन, मनिंदर सिंग मिडफील्डमध्ये, पवन राजभर, गुरज्योत सिंग, उत्तम सिंग, कर्णधार सिमरनजीत सिंग आघाडी फळीत काम पाहतील. पुरुष संघाचा ब गटात समावेश असून याच गटात इजिप्त, जमैका, स्वित्झर्लंड हे संघही आहेत. गट अ मध्ये नेदरलँड्स, नायजेरिया, पाकिस्तान, पोलंड, क गटात ऑस्ट्रेलिया, केनिया, न्यूझीलंड, त्रिनिदाद-टोबॅगो, ड गटात फिजी, मलेशिया, ओमान, अमेरिका यांचा समावेश आहे.

भारतीय संघातील अनेक खेळाडूंना हॉकी फाईव्ह प्रकार खेळण्याचा अनुभव असून ते या स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाले आहेत. यासाठी भरपूर तयारी केली असून पदक मिळविण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत, असे प्रशिक्षक सरदार सिंग म्हणाले.

Advertisement
Tags :

.