महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीहरी नटराजला रौप्यपदक

06:05 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

फ्रान्समध्ये झालेल्या तिसाव्या मेरी नॉस्ट्रम जलतरण स्पर्धेत भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजने पुरुषांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकावले. पुरुषांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये नटराजने 25.50 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान मिळविले. या प्रकारात हंगेरीच्या अॅडॅम झेजोने 25.46 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण, ब्रिटनच्या स्कॉट गिब्सनने 25.64 सेकंदासह कास्यपदक घेतले. श्रीहरी नटराजने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. पुरुषांचा 50 बॅकस्ट्रोक जलतरण क्रीडा प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये 2021 सालच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज या दोन भारतीय जलतरणपटूंनी आपला सहभाग दर्शवला आहे. मेरी नोस्ट्रम टूरला फ्रान्समधून प्रारंभ झाला असून आता या स्पर्धेतील पुढील टप्पे मोनॅको, बार्सिलोना आणि कॅनेट येथे होणार आहेत. ह स्पर्धा 9 दिवसांच्या कालावधीची आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article