चांदीची आयात यंदा वाढणार?
व्यवसाय, व्यवहार सुरळीत झाल्याचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चांदीच्या मागणीत चांगली वाढ दिसल्याने यावषी आयातीत विक्रम होण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. यंदा चांदीची आयात 6500 ते 7000 टनच्या घरात पोहोचू शकते, असा अंदाज आहे. असे झाल्यास कोरोनापूर्व काळाएवढी चांदीची तमागणी पूर्ववत राहील, हे नक्की.
अर्थव्यवस्था सुधारलेली असून यात उद्योगांचा वाटा लक्षणीय ठरतो आहे. या उद्योगासह इतरांनीही चांदीची मागणी वाढीव नोंदवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. निर्मिती कार्याबरोबर विविध व्यवसायदेखील आता जोमाने कार्यरत झाले आहेत. 2022 मध्ये पहिल्या सात महिन्यात 5100 टन इतकी चांदी आयात करण्यात आली असल्याने यावरून वरील उद्दिष्ट पार केले जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.
2021 मध्ये किती टन आयात
संपूर्ण 2021 वर्षात 2773 टन इतक्मया चांदीची आयात करण्यात आली होती. उत्सवासह विविध उपक्रमांवर त्या काळात निर्बंध लादले गेल्याने चांदीची मागणी कमी नोंदवली गेली.
जुलैमध्ये दमदार आयात
एकटय़ा जुलै महिन्यात भारताने 1700 टन चांदीची आयात केली आहे. तर 2021 मध्ये पहिल्या सात महिन्यात निव्वळ 110 टन चांदीची आयात करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.