महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूरात इंडिया आघाडीकडून बदलापूर अत्याचाराविरोधात मुक निदर्शने! काळ्या फिती बांधून केला निषेध

04:13 PM Aug 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
India Aghadi Kolhapur Protest
Advertisement

बदलापूर येथील दुष्कर्माच्या निषेधार्थ आज महाविकास आणि इंडिया आघाडीकडून कोल्हापुरात मूक आंदोलन करण्यात आलं. बिंदू चौकात झालेल्या या निषेध सभेमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उपस्थिती लावली. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर बंद ऐवजी निदर्शने करण्यात आली.

Advertisement

बदलापूर येथे काही दिवसापूर्वी शाळकरी मुलींवर अत्याचार झाला. या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणावरही उमटले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. राज्यात चाललेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारला होता. मात्र या बंदला न्यायालयाने परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीकडून हा बंद मागे घेण्यात आल्याचं जाहीर केलं. मात्र बंद जरी मागे घेतला असला तरी या अत्याचाराविरोधात राज्यभरात मूक निषेध केला.

Advertisement

दरम्यान, आजच्या सभेला महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यासह अनेक नेत्यांनी आपल्या तोंडावर आणि हाताला काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध केला. लाडकी बहीण फक्त प्रसिद्धीसाठी हवी की सुरक्षेसाठी, महाराष्ट्रात लेकींना छत्रपतींचा कायदा हवा, सत्ताधाऱ्यांचे लक्ष सत्तेवर...महिला सुरक्षा वाऱ्यावर, भीक नको पैशांची...सुरक्षा हवी लेकींची अशा लक्षवेधी आशयाचा मजकूर असलेले फलक या आंदोलनातून दाखवण्यात आले.

या आंदोलनासाठी काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील,आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, आमदार राहूल आवळे, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हाध्यक्ष विजय दवणे, राष्ट्रवादीचे व्हि. बी. पाटील, आर. के. पवार, सीपीआयचे रघुनाथ कांबळे,  आपचे जिल्हाध्यक्ष देसाई यांनी उपस्थिती लावली.

Advertisement
Tags :
Badlapur atrocitieskolhapur newsKolhapur ProtestSilent protests
Next Article