महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्वीडन बॅडमिंटन स्पर्धेत सिहाग विजेती

06:52 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

भारताची महिला बॅडमिंटनपटू देविका सिहागने स्वीडनमधील अपसेला येथे झालेल्या स्वीडीश खुल्या आंतरराष्ट्रीय सिरीझ बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.

Advertisement

रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात देविका सिहागने फ्रान्सच्या चौथ्या मानांकित लिओनाईस ह्युएटचा 18-21, 21-14, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. हा अंतिम सामना 74 मिनिटे चालला होता. या लढतीत देविकाला पहिला गेम गमवावा लागला. पण त्यानंतर तिने अपाल्या खेळातील चुका सुधारुन पुढील सलग दोन गेम्स जिंकून ह्युएटचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेमध्ये चंदीगडच्या 18 वर्षीय देविका सिहागने उपांत्य लढतीत युक्रेनच्या पाचव्या मानांकित बुहरोवाचा 21-15, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये 31 मिनिटात फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. बेंगळूरच्या प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकादमीमध्ये देविका सिहाग बॅडमिंटनचा सराव करते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article