कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात होण्याची चिन्हे

12:08 PM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिसरा रेल्वेगेट येथे साहित्याची जमवाजमव : पिलरसाठी लोखंडी सळ्या बांधणी सुरू 

Advertisement

बेळगाव : तिसऱ्या रेल्वेगेट येथील दुसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दिवसांपासून याठिकाणी लोखंड, तसेच इतर साहित्याची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाल्यास बेळगावच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. टिळकवाडी येथील तिसरा रेल्वेगेट येथे दोन वर्षांपूर्वी उड्डाणपूल उभारण्यात आला. पहिल्या टप्प्यात एका बाजूचा उड्डाणपूल उभा राहिला तर उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असे उद्घाटनावेळी जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र हे काम वर्षानुवर्षे रखडले. त्यामुळे काँग्रेस रोडवरून सुरू असलेली वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून वळवावी लागली.

Advertisement

सध्या या ठिकाणी सर्व्हिस रोड अरुंद असल्यामुळे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. मोठे कंटेनर उड्डाणपुलाच्या पिलरला घासले जात असून धोका निर्माण झाला आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने काम रखडल्याचे सांगण्यात आले. सध्या असलेल्या उड्डाणपुलाच्या बाजूने काँक्रिटचे पिलर जमिनीलगत उभारण्यात आले आहेत. परंतु त्यानंतरचे काम ठप्प होते. मध्यंतरी कंत्राटदाराने सर्व मशिनरी या ठिकाणाहून हटविल्या. पिलरमध्ये घालण्यात आलेल्या लोखंडी सळ्या गंजून गेल्या. तसेच येण्या-जाण्यास नागरिकांना रस्ताही उपलब्ध नव्हता. मागील दोन दिवसांपासून उड्डाणपुलाच्या खाली साहित्याची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी यंत्रसामग्री आणण्यासाठी प्लॅटफॉर्मही तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पिलरसाठी लोखंडी सळ्या बांधल्या जात आहेत. त्यामुळे या कामाला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article