महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘आयपीएल’ लिलावात पाच खेळाडूंना भरपूर मागणीची चिन्हे

06:43 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येत्या मंगळवारी दुबई येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात अव्वल दर्जाच्या खेळाडूंसाठी बोली युद्ध होण्याची शक्यता असून क्रिकेट जगत त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे. खेळाडू त्यांना करारबद्ध करण्यासाठी 2 कोटी ऊपयावरून आरंभ बोली सुरू करू शकतात आणि जास्तीत जास्त रक्कम मिळण्याची अपेक्षा धरू शकतात. आयपीएलच्या 10 संघांचे लिलावात खेळाडूंना कराराबद्ध करण्यासाठी एकत्रितपणे 262.95 कोटी ऊपयांचे बजेट आहे. या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंना विलक्षण भाव येण्याची शक्यता असून त्यात खालील पाच खेळाडूंचा समावेश आहे.

Advertisement

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) : व्यस्त वेळापत्रकामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होता न आलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा पुनरागमन करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या नुकत्याच नेंदविल्या गेलेल्या विश्वचषक विजयात कमिन्सने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आणि त्याच्या कामगिरीची प्रशंसा झालेली आहे. या 30 वर्षीय खेळाडूची आरंभ बोली सर्वोच्च गटातील म्हणजे 2 कोटी ऊपयांची असून त्याला भरपूर मागणी राहील असा अंदाज आहे.

रचिन रवींद्र (न्यूझीलंड) : एक धडाकेबाज फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू म्हणून उदयास आलेला रचिन रवींद्र हा भारतीय वंशाचा खेळाडू असून त्याने विश्वचषकादरम्यान तीन शतके झळकावून आणि काही महत्त्वपूर्ण बळी घेऊन छाप सोडली आहे. 24 वर्षांच्या रचिन रवींद्रची आरंभ बोली 50 लाखांची असून त्याला करारबद्ध करण्यासाठी संघांमध्ये शर्यत लागण्याची शक्यता आहे.

हॅरी ब्रूक (इंग्लंड) : आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जाणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू हॅरी ब्रूकलाही भरपूर मागणी राहण्याची चिन्हे आहेत. विश्वचषकात त्याने माफक कामगिरी केलेली असली, तरी त्याची आरंभ बोली 2 कोटी रुपयांची असून लिलावात आपला चांगला प्रभाव पडण्याची अपेक्षा तो बाळगून असेल.

जेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका) : विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी याने त्या स्पर्धेत 20 बळी घेऊन पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले. 23 वर्षांच्या या गोलंदाजाची आरंभ बोली देखील 2 कोटी ऊपयांची असून तो चांगला करार मिळवून कारकिर्दीत आणखी मोठी झेप घेण्यास उत्सुक असेल.

वानिंदू हसरंगा (श्रीलंका) : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने मोकळे केल्यानंतर श्रीलंकेचा हा अष्टपैलू खेळाडू ‘आयपीएल’मध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. तो त्याच्या लेगस्पिनसाठी आणि प्रभावी कामगिरीसाठी ओळखला जातो. हसरंगा दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकला नसला, तरी त्याची आरंभ बोली 1.5 कोटी रुपयांची असून त्याला लक्षणीय मागणी राहू शकते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article