महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गाझामधील शिफा हॉस्पिटलला घेराव

06:39 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलच्या हल्ल्यात विध्वंस सुरूच : हमास दहशतवाद्यांशी जोरदार संघर्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ गाझा

Advertisement

हमासचा नायनाट करण्यासाठी इस्रायलने हाती घेतलेली मोहीम थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्रायली सैन्याने व्यापक मोहिमेला गती देत आता गाझामधील अल-शिफा रुग्णालयाला घेराव घातला आहे. शनिवारी इस्रायली हवाई हल्ल्यामुळे रुग्णालयाची मुख्य ऑक्सिजन पुरवठा लाईन नष्ट झाल्यामुळे उपचाराधीन ऊग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रुग्णालयातील वीजपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे 39 मुलांचा मृत्यू होण्याचा धोका असल्याचे रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांनी सांगितले. तसेच इस्रायली सैन्याने अल-शिफा हॉस्पिटलला वेढा घातला असून हमासच्या दहशतवाद्यांशी त्यांचा परिसरात जोरदार संघर्ष सुरू असल्याचे पॅलेस्टिनी सुरक्षा सूत्रांनी सांगितले.

गाझा शहरातील अनेक भागात विशेषत: अल शिफा हॉस्पिटलच्या आसपास इस्रायली सैन्य दल आणि हमास चळवळीची सशस्त्र शाखा अल-कसाम ब्रिगेडचे दहशतवादी यांच्यात हिंसक सशस्त्र चकमकी व प्रचंड संघर्ष सुरू असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलच्या बाजूने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 1946 मध्ये स्थापित, अल शिफा कॉम्प्लेक्स ही गाझा पट्टीतील सर्वात मोठी आरोग्य संस्था आहे. त्यात तीन विशेष रुग्णालयांचा समावेश आहे.

इस्रायली ड्रोन वैद्यकीय संकुलातील कोणालाही लक्ष्य करत असल्यामुळे डॉक्टरांना वैद्यकीय सेवा प्रदान करता येत नाही, असा दावा शिन्हुआ वृत्तसंस्थेने केला आहे. ऊग्णालयासह परिसरातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाल्याने नवजात बालके आणि जीवरक्षक उपकरणांवर अवलंबून असलेल्या रुग्णांचाही काही तासांत मृत्यू होण्याचा धोका आहे. “अल-शिफा रुग्णालयावरील हल्ले तीव्र झाले असून रुग्णालयातील कर्मचारी भयानक परिस्थिती अनुभवत आहेत” असेही तेथील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#international#social media
Next Article