Kolhapur Crime : सिद्धूचा खून पैशांसाठी, खिशातील रक्कम, दुचाकी गायब
कोल्हापुरात सिद्धू बनवीचा गळा आवळून खून
कोल्हापूर : हॉकी स्टेडियम येथील विश्वपंढरी समोर सिद्धू शंकर बनवी (वय २०) याचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मनिष राउत याला अटक केले आहे. सिद्धू बनवी याने गोकाक येथून कामाचे ३० हजार रुपये आणले होते. ही रक्कम आणी सिद्धूचा मोबाईल अद्यापही गायब असल्यामुळे त्याचा खून पैशासाठी झाला आहे काय या दृष्टीने पोलिसांनी तपासाची सुत्रे गतिमान केली आहेत.
हॉकी स्टेडियम येथील विश्वपंढरी समोर सोमवारी पहाटे सिद्धू बनवी याचा हॉकी स्टेडीयम परीसरात गळा आवळून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे तो संशयित मनिष राऊतच्या दुचाकीवरून व्हीनस कॉर्नर येथे जेवायला गेल्याचे उघडकीस आणले. यानंतर हॉ की स्टेडीयम परिसरात आणून त्याचा खून केल्याचेही समोर आले.
याप्रकरणीमनिष राऊत अटकेत असून त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जेवणासाठी मनिष व सिद्धू हे सिद्धूच्याच दुचाकीवरुन गेले होते. मात्र दुचाकी गायब आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.
शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान
गेल्या दोन महिन्यापासून सिद्ध बनवी गोकाकमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता. तेथील मालकाकडून ३० हजार रुपये घेतले होते. तिकडून रविवारी सकाळीच कोल्हापुरात परतला. कळंबा साई मंदिर परिसरात आल्यानंतर त्याने मनिष राऊतला फोन करून बोलावून घेतले. तिथून दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले. रात्री दोन वाजता व्हीनस कॉर्नर येथे जेवण केले. यावेळी हॉटेलचे बिल भागविण्यासाठी सिद्ध बनवीचा मोबाईल वापरला होता. हा मोबाईल अद्यापही मिळून आलेला नसल्याने पोलिसांकडून मोबाईलचा शोध सुरू आहे. तसेच त्याच्याजवळ जर ३० हजारांची रक्कम होती तर ही रक्कम कोठे गायब झाली याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.