सिद्धिविनायक इंग्रजी स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर : तालुका पातळीवर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत येथील मराठा मंडळ संचलित सिद्धिविनायक इंग्रजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कुस्ती स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक गटातून 35 किलो वजनी गटात सर्वेश पाटील प्रथम, 38 किलो वजन गट मिलिंद पाटील, 44 किलो वजन गट माधव धबाले प्रथम, 60 किलो वजन गट प्रितम रॉय, 71 किलो वजन गट रवळनाथ पाटील, 110 किलो वजन गट प्रताप सपलिंगा, बुद्धिबळ स्पर्धेत श्रेया धबाले, श्रेया जोल्लद, संप्रीत तडकोड प्रथम क्रमांक, समृद्ध पाटील, कृष्णा मेंडीलकर स्केटींग स्पर्धेत प्रथम, विमर्ग टोनी, श्रेयश पाटील, सोहम गावडे कराटे स्पर्धेत प्रथम, 24 किलो वजन गट प्रणव कवळेकर, 43 किलो वजन गट प्रथमेश मयेकर, 38 किलो वजन गट काव्या व्हनाली, 50 किलो वजन गट रेष्मा पाटील, 68 किलो वजन गट अस्मिता देसाई तसेच अजय पाटील 100 मीटर धावणे, 400 मी. धावणे, 80 मी. अडथळा शर्यतमध्ये प्रथम क्रमांक घेऊन सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला.
रिले प्रथम पियूश सावंत, मयूर मेलगे, गौतम देसाई, उंच उडीमध्ये करण मेलगे तृतीय क्रमांक, 100 मीटर धावणे प्रथम धीरज पाटील, माधव धबाले 400 मीटर धावणे, 80 मीटर हर्डल्स प्रथम इंद्रनिल पाटील 200 मीटर धावणे प्रथम, मिलींद पाटील उंच उडीमध्ये प्रथम, कृतीका चौगुले 100 मी. धावणे, 80 मी. हर्डल्स प्रथम श्रेया यळळूरकर 600 मी. धावणे प्रथम, कार्तिक हट्टीकर 100 मी. धावणे प्रथम, मयुरेश पाटील 400 मी. प्रथम, ओम देवलत्तकर 3000 मी. द्वितीय, पार्थ गुंजीकर 4×100 मी. रिले प्रथम, मयुरेश मनेरीकर 4×100 मीटर द्वितीय तसेच सांघिक खेळामध्ये कबड्डी प्रथम, थ्रो बॉल प्रथम, खो-खो द्वितीय, व्हॉलिबॉलमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, संचालक परशराम गुरव, शिवाजी पाटील, मुख्याध्यापिका वैभवी वंजारे, ज्योती हेब्बाळकर व क्रीडाशिक्षक उमेश धबाले, यांचे मार्गदर्शन लाभले.