For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन

08:40 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी 20 लीग क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक 27 रोजी सायंकाळी 6.30 वाजता युनियन जिमखाना मैदानावर होणार आहे. 28 मार्चपासून सामन्यांना प्रारंभ होणार आहे. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष अविनाश पोतदार, स्पर्धा पुरस्कर्ते प्रमोद कदम तसेच 8 संघांचे संघमालक के. आर. शेट्टी किंग्सचे प्रणय शेट्टी, साईफार्म स्पोर्ट्स क्लबचे रोहित पोरवाल, रोहन ट्रेडर्स बीएससीचे ऋषिकेश कदम, इंडियन बॉइज हिंडलगा संघाचे काशिनाथ नाईक, पोतदार रॉयल सीसीआयचे निशिल पोतदार, साईराज वॉरिअरचे महेश फगरे, सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानाचे विठ्ठल गवस, भाटे वॉरियर्सचे ऋतुराज भाटे हे उपस्थित राहणार आहेत. बेळगाव प्रथमच लेदर बॉल क्रिकेटचे सामने प्रकाश झोतात होणार असून क्रीडा प्रेमींसाठी ही एक परवणी ठरणार आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व 8 संघ तोलामोलाचे असून सर्व सामने रंगतदार होणार असल्याचे वर्तविले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.